सोहम रानडे याचे अनोखे रिटर्न गिफ्ट

22 Feb 2023 14:36:23
नागपूर, 
युवा पिढी ही उत्सवप्रिय आहे. त्यात जर कोणाचा (Soham Ranade) वाढदिवस असेल तर जय्यत तयारी असते. केक कापायचा, रिटर्न गिफ्ट म्हणून वर्गात किंवा आजूबाजूच्या मित्रांना पेन, पेन्सिल वाटायचे प्लॅनिंग आधीच झालेले असते. पण सोहमच्या डोक्यात मात्र वेगळीच कल्पना आकार घेत होती. बाबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाढदिवसाला त्याने वर्ग मित्रांना रिटर्न गिफ्ट म्हणून पिशव्यांचे वाटप केले. ‘से नो टू प्लॅस्टिक’ असा सुंदर छोटासा संदेश त्यावर लिहिला होता.
 
Soham Ranade
 
सोहमचे वडील गजानन रानडे (Soham Ranade) रोटरी क्लब पश्चिम नागपूरचे अध्यक्ष म्हणून काम करतात, तेव्हा नवनवीन उपक्रम आखतात, तसेच मलाही काही तरी करायचे, ही कल्पना सोहमच्या डोळ्यासमोर होतीच. पश्चिमचे काम करताना बाबांनी प्लॅस्टिक विरोधात मोहीम राबविली. मग आपणही असे काही करू शकतो का? असा विचार करून या वाढदिवसाला त्याने कल्पना साकारली देखील. आपल्या सगळ्या वर्ग मित्रांना त्याने रिटर्न गिफ्ट म्हणून पिशव्यांचे वाटप केले. से नो टू प्लॅस्टिक’ असा सुंदर छोटासा संदेश त्यावर लिहिला होता. ह्या कल्पनेला त्याच्या आर. एस. मुंडले इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका वर्षा चांगदे तसेच पर्यवेक्षक पद्माकर चारमोडे यांनी समर्थन दिले. सर्व शिक्षकांनी या उपक्रमासाठी त्याचे कौतुक आणि अभिनंदन केले.
 
 
आईकडून मिळाले बाळकडू
आई स्नेहल रानडे (Soham Ranade) ह्या सोहम कलाविष्कार नावाने प्रसिद्ध असलेल्या संगीत गृपच्या संयोजिका तसेच समाजसेविका आहेत. आपल्या छोट्या छोट्या कामातून समाजातील इतर मुलांना काहीतरी चांगला संदेश देता यावा, असे बाळकडू सोहमला आईकडूनच मिळाले.
 
 
- सौजन्य : गजानन रानडे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0