गुलाबचंद कटारिया आसामचे नवे राज्यपाल

    दिनांक :22-Feb-2023
Total Views |
गुवाहाटी, 
राजस्थानचे माजी गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांनी आसामचे राज्यपाल (Governor of Assam) म्हणून शपथ घेतली. गुलाबचंद कटारिया यांनी बुधवारी प्राध्यापक जगदीश मुखी यांच्या जागी आसामचे ३१ वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संदीप मेहता यांनी कटारिया यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

Governor of Assam
 
या (Governor of Assam) शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी, भाजप नेते आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गुलाबचंद कटारिया हे उदयपूर, राजस्थानचे असून ते राजस्थानचे माजी गृहमंत्री होते. राज्यपालपदी नियुक्ती होण्यापूर्वी ते राजस्थान विधानसभेतील विरोधी पक्षनेतेही होते. गुलाबचंद कटारिया मंगळवारी राजभवनात पोहोचले. येथे त्यांचे पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. त्याचवेळी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मंगळवारी संध्याकाळी कटारिया यांच्याशी शिष्टाचार भेट घेतली. आज संध्याकाळी शिष्टाचाराने गुलाब चंद कटारिया आणि त्यांची पत्नी अनिता कटारिया यांची भेट घेतली. सरमा म्हणाले की, कामाख्या मातेच्या पवित्र भूमीवर गुलाबचंद कटारिया यांचे स्वागत आहे. त्यांच्या अमूल्य मार्गदर्शनाची अपेक्षा आहे.