यवतमाळ जिल्ह्यात सायबर पोलिस ठाणे कार्यान्वित

23 Feb 2023 15:38:57
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड (Cyber ​​police station) यांनी यवतमाळ जिल्ह्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सायबर क्राईम गुन्ह्यांचा वाढता आलेख पाहता यवतमाळ पोलिस विभागात सायबर पोलिस ठाणे सुरू करण्यात येईल, असे सुतोवाच केले होते. त्या अंतर्गत पोलिस अधीक्षक कार्यालय, यवतमाळ येथील सायबर सेल येथे नवीन सायबर ठाण्याचे उद्घाटन अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांच्या हस्ते २२ फेब्रुवारी रोजी करण्यात आले.
 
Cyber ​​police station
 
आजच्या या इंटरनेट युगात मोबाईल व इंटरनेट (Cyber ​​police station) याशिवाय आपले दैनंदिन कामे अशक्य झालेले आहेत. दैनंदिन जीवनातील अनेक बाबी आभासी (ऑनलाईन) झाल्या असून समाज माध्यमाच्या (सोशल मिडिया) वाढत्या वापरामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती इंटरनेट व सोशल मिडियासारख्या ऑनलाईन माध्यमांचा वापर करून गुन्हे करीत आहेत. त्याच्या गतीने शोध व्हावा यासाठी या ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. यावेळी पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पियुष जगताप हे उपस्थित होते. सायबर पोलिस ठाण्यात तांत्रीक स्वरुपाचे व गुंतागुंतीचे प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात येईल. सायबर पोलिस ठाणे येथे प्रभारी अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक मनीष दिवटे यांची नेमणूक करण्यात आली आहे.
 
 
सायबर गुन्ह्याचे वाढते प्रमाण पाहता (Cyber ​​police station) गुन्हे उघडकीस आणने आणि (Cyber ​​police station) सायबर गुन्ह्यापासून नागरिकांनी कसे वाचावे, याकरिता वेगवेगळे उपक्रम राबवून जनजागृती व समुपदेशन करणे अशा मार्गदर्शनपर सूचना विशेष पोलिस महानिरीक्षक, अमरावती यांनी केल्या. तसेच यवतमाळ शहरापासून दूर अंतरावर राहणारे तक्रारदार असल्यास त्यांनी यवतमाळ येथे न येता आपल्या सुरवातीला जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. आपल्याला लॉटरी, जॉब ऑफर, ईलेक्ट्रिक बिल, क्रेडीट कार्ड, ऑनलाईन कर्ज किंवा ५-जी अपडेट इत्यादींबाबत मोबाईल क्रमांकावरुन कॉल आल्यास अशा प्रकारच्या कोणत्याही अनोळखी कॉलला प्रतिसाद देवू नका, कोणत्याही qलकवर खात्री झाल्याशिवाय ‘क्लिक' करू नये, असे आवाहनही करण्यात आले.
 
 
त्याचप्रमाणे खात्री केल्याशिवाय सर्च केलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करू नका. दुर्दैवाने आपल्यासोबत सायबर क्राईमचा प्रकार घडल्यास तत्काळ (Cyber ​​police station) सायबरसेल येथे संपर्क करावा. तसेच १९३० या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा किंवा पोर्टलवर जाऊन सायबर क्राईमबाबत ऑनलाईन तक्रार नोंदविता येईल, असे मनीष दिवटे यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0