स्पिन-ए-यार्न आंतरविद्यालयीन स्पर्धेत स्कूल ऑफ स्कॉलर्सने पटकावला प्रथम क्रमांक

    दिनांक :23-Feb-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
स्कूल ऑफ स्कॉलर्स, (School of Scholars) यवतमाळ विद्यालयाद्वारा ३ फेब्रुवारी रोजी आंतरशालेय नाट्यस्पर्धा आयोजित करण्यात आले होते. महाभारत या विषयांतर्गत ही स्पर्धा घेण्यात आली. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी उत्साहाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांना वेळेवर एक विषय दिल्या जातो आणि त्यांना ८ मिनिटांची लघुनाटिका सादर करावी लागते. या स्पर्धेमध्ये एकूण ११ शाळांनी सहभाग घेतला होता. महाभारत या विषयावरील अनेक कथांवर सुंदर सादरीकरण करण्यात आले. यवतमाळच्या स्कूल ऑफ स्कॉलर्सने एकलव्याची कथा सादर करून पहिले पारितोषिक पटकाविले. विजेत्या संघाचे आयुष्मान जैन, आस्था उत्तरवार आणि श्रावणी जोशी यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाने प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
 
School of Scholars
 
स्कूल ऑफ स्कॉलर्स, (School of Scholars) अकोला (केके) ने उपविजेता ट्रॉफी जिंकली तर तिसरा क्रमांक स्कूल ऑफ स्कॉलर्स, वानाडोंगरी, नागपूरने मिळविला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार स्कूल ऑफ स्कॉलर्स, अत्रे ले आऊट, नागपूरच्या स्कॉलर इशिता लिमये हिने मिळवला. परीक्षक म्हणून प्रा. जितेंद्रqसग भारुळकर, आदर्श महाविद्यालय, इंग्रजी विभाग धामणगाव रेल्वे व प्रा. डॉ. सचिन तेलखडे, इंग्रजी विभाग, कला व वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ यांनी कार्यभार सांभाळला.
 
 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीशा रहेजा आणि अनुष्का तम्मेवार यांनी, तर आभारप्रदर्शन श्रावणी मुराब हिने केले. विजेत्या संघाच्या मार्गदर्शक शिक्षक सरिता उपाध्ये तसेच कार्यक्रमाच्या निमंत्रक मयुरी मेहता, इंग्रजी विभाग प्रमुख होत्या. (School of Scholars) हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता इंग्रजी विभागाच्या सर्व शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले. शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्रसिंह चौहान, उपमुख्याध्यापक रीना काळे, प्रशासकीय अधिकारी कृणाल वाघमारे व सर्व शिक्षकांनी कार्यक्रमाचे कौतुक केले व विजेत्यांचे अभिनंदन केले.