कारंजा लाड,
Karanja City मागील काही महिंन्यापासून कांरजा शहरातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांची अक्षरशः चाळण झाल्याने शहरातील रस्ते खड्डेमय झाले होते. परिणामी या रस्त्यावरून वाहन चालविताना व पायदळ चालताना कसरत करावी लागत होती. परंतु आता शहरातील अतर्गत रस्त्यांचा कायापालट होणार असून, मार्च अखेरपुर्वी या रस्त्यांच्या कामास सुरूवात होणार आहे. शहरातील आठ रस्त्यांची कामे लवकरच सुरू होणार असून, यासाठी ८० कोटी ७ लाख ९२ हजार २७२ रूपयांचा निधी लागणार आहे. कारंजा नगर परीषदेच्या वतीने यासाठी निविदा मागविण्यात आल्या असून, निविदा उघडल्यानंतर मार्च अखेर पर्यंत रस्त्यांची कामे सुरू होतील.
![saad3454 saad3454](https://www.tarunbharat.net/Encyc/2023/2/24/saad3454_202302241513251210_H@@IGHT_400_W@@IDTH_600.jpg)
यात महाविर ब्रम्हचार्य आश्रम ते सिंधी कॅम्प या रस्त्यांचे डांबरीकरण करणे, पोहा वेश ते सांरग तलाव या रस्त्याचे डांबरीकरण करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हा मध्यवर्ती बॅके पर्यंतच्या रस्त्याचे कॉक्रीटकरण करणे, कांरजा बसस्थानक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या रस्त्याचे कॉक्रीटीकरण करणे, Karanja City उपजिल्हा रूग्णालय ते सिंधी कॅम्प पर्यंतच्या रस्त्याचे कॉक्रीटीकरण करणे, उपजिल्हा रूग्णालय ते बसस्थानकापर्यतच्या रस्त्याचे कॉक्रीटीकरण करणे, शहीद भगतसिंग पुतळया पासुन अविनाश मेडीकल पर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे आणि खुशी मोबाईल गॅलरी ते रामासावजी चौक या रस्त्याचे कॉक्रीटीकरण व नाली बाधंकाम करण्याचा कामाचा समावेश आहे. हे काम पुर्ण करण्यासाठी सहा महीन्याचा कालावधीत देण्यात आला असल्याने पुढील सहा महीन्यात कांरजा शहरातील रस्ते गुळगुळीत होतील.