यवतमाळ येथील दत्त हॉस्पिटलमध्ये प्रथमचदुर्बिणद्वारे किडनी स्टोन यशस्वी शस्त्रक्रिया

    दिनांक :24-Feb-2023
Total Views |
यवतमाळ, 
वैद्यकीय क्षेत्रात विविध तंत्रज्ञान विकसित होत असताना यवतमाळ येथील श्री दत्त हॉस्पिटल मध्ये डॉ. प्रतीक प्रमोद चिरडे यांनी आपल्या कौशल्याचा वापर करून पासष्ट वर्षीय रुग्णावर प्रथमच Kidney stone surgery किडनी स्टोनची दुर्बीणद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया करून यवतमाळच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. लघवीमधून रक्त जाणे व पोटातील असह्य वेदनेने त्रस्त असलेला एक 65 वर्षीय पुरुष रुग्ण यवतमाळ येथील दत्त हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाला. प्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉ. प्रतीक चिरडे यांनी तातडीने प्रारंभिक उपचार केले.
 
 
Opretion
 
दरम्यान Kidney stone surgery किडनीतून मूत्र वाहून नेणार्‍या नळीत स्टोन अडकल्याने डाव्या किडनीवर प्रचंड दाब निर्माण झाल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे त्या रुग्णाच्या डाव्या किडनी चे दोन भाग असून दोन विभिन्न नलिका आढळल्या. अशा दुर्मिळ विशिष्ट शरीररचनेच्या रुग्णाची शस्त्रकि‘या जटिल आणि आव्हानात्मक होती. डॉ. प्रतीक चिरडे यांनी आपल्या कौशल्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लघवीच्या मार्गाने दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया पार पाडली. शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले योजनेंंतर्गत सर्वसामान्य व गरजू रुग्णाला उच्च दर्जाची युरोलॉजी सुविधा श्री दत्त हॉस्पिटलमध्ये विनामूल्य मिळाल्याने रुग्ण व त्याच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले.