राळेगाव तालुक्याला 4 कोटींचा निधी

25 Feb 2023 18:47:26
तभा वृत्तसेवा
राळेगाव,
राळेगाव तालुक्यातील मतदारसंघाचे आमदार (MLA Dr. Ashok Uike) डॉ. अशोक उईके यांच्या प्रयत्नांनी राळेगाव शहराला 4 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. या निधीमधून शहरात विकास कामे करण्यात येणार आहेत. राज्यात शिंदे, फडणवीस सरकार सत्तेत येताच आ. डॉ. उईके यांनी राळेगाव शहर विकासासाठी विविध प्रभागांमध्ये महत्त्वाची कामे प्रस्तावित करून यासाठी शासनाकडून हा निधी मंजूर करून घेतला आहे.
 
MLA Dr. Ashok Uike
 
यामध्ये शहरातील संत तुकाराम कृषी कल्याण प्रतिष्ठान भवन, शांतीनगर भागातून वाहणार्‍या नाल्यावर कव्हरिंग स्लॅब व जवळील रस्त्याचे बांधकाम, परधान समाजाच्या स्मशानभूमीला संरक्षण भिंतीचे बांधकाम, आठवडी बाजारातील माता मंदिराला सभागृह बांधकामासह विविध प्रभागांतील सिमेंट रस्ते, मातानगरमध्ये गजानन महाराज मंदिर सौंदर्यीकरण व संरक्षण भिंत, विविध प्रभागांत हायमास्ट बसवणे अशा कामांचा समावेश आहे.
 
 
राळेगाव नगर पंचायतमध्ये सध्या भाजपाची सत्ता नसतानासुद्धा भाजपा तालुका अध्यक्ष चित्तरंजन कोल्हे, शहर अध्यक्ष डॉ. कुणाल भोयर, माजी व आजी नगरसेवक तथा सभापती यांच्या आग‘हास्तव आणि शहर विकासाच्या दृष्टीने आ. (MLA Dr. Ashok Uike) डॉ. अशोक उईके यांनी शासनाकडून या निधीची तरतूद करून घेतली आहे. मागील काळातही आ. डॉ. उईके यांच्या प्रयत्नांतून राळेगाव शहराला 5 कोटी रुपयांचा नाविन्यपूर्ण निधी मंजूर झाला होता. त्या निधीतून नपं प्रशासकीय इमारत नूतनीकरण व जुन्या आठवडी बाजारातील संत गाडगेबाबा व्यापारी संकुलाचे बांधकाम इत्यादी महत्त्वाची कामे करण्यात आली. नगर पंचायतच्या मागील झालेल्या कामांचा निकृष्ट दर्जा पाहता यावेळी सर्वच कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविली असून त्यामुळे सर्व कामे दर्जेदार व वेळेत होतील असा विश्वास आमदार डॉ. अशोक उईके (MLA Dr. Ashok Uike) यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिला.
Powered By Sangraha 9.0