तभा वृत्तसेवा
पवनी,
Citizens checked संजय चव्हाण स्मृतीप्रित्यर्थ समर्पण बहुद्देशीय संस्थेतर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. पवनी परिसरातील शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेत आरोग्य व नेत्र तपासणी करून घेतली. यावेळी गरजूंना चष्मे वाटप करण्यात आले तर अनेकांनी रक्तदान करून समाजाप्रती कर्तव्याची जाणिव दाखवून दिली. शिबिराचे उद्घाटन लोकमंगल समूहाचे अध्यक्ष अनिल मेंढे तर प्रमुख अतिथी म्हणून मोहन सूरकर, सृष्टी नेत्रालय नागपूरचे संचालक सुनील फडके तथा ब्लडबँकेचे संचालक भोयर उपस्थित होते.
शिबिरात शेकडो नागरिकांची आरोग्य व नेत्र तपासणी करण्यात आली. रुग्णांना औषधी वाटप तसेच गरजू व्यक्तींना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन संदीप नंदरधने यांनी केले. Citizens checked शिबिराच्या यशस्वीतेकरिता संस्थेचे अध्यक्ष अजय चव्हाण, सचिव शेखर बावनकर, उपाध्यक्ष अतूल मुंडले, महेश कावळे, मुलचंद बावनकर, संदीप नंदरधने, लोकेश दडवे, उल्हास सावरकर, निखिल राऊत, सतिष जांभूळकर यांनी सहकार्य केले.