फ्रान्स सरकारविरोधात नागरिक रस्त्यांवर

    दिनांक :27-Feb-2023
Total Views |
पॅरिस, 
रशिया-युक्रेन युद्धाच्या काळात (French government) फ्रान्स युक्रेनला शस्त्रांचा पुरवठा करत असल्याने देशवासीयांकडून विरोध होत असून, राजधानी पॅरिसमधील हजारो नागरिक रस्त्यांवर उतरले आहेत. त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. जगाने युक्रेनला शस्त्रांचा पुरवठा केल्यास युद्धाचा कालावधी वाढेल. फ्रान्स सरकारला मदत करायचीच असल्यास रशियाला हल्ले करण्यापासून रोखावे, अशी मागणी करत फॉर पीस (शांततेसाठी), नो टू थर्ड वर्ल्ड वॉर, अशा घोषणा दिल्या.
 
French government
 
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा चर्चेतूनच तोडगा निघेल. (French government) फ्रान्सच्या शस्त्रसंधीमुळे तिसर्‍या महायुद्धामुळे भीती वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अनेक शहरात लोकांनी युक्रेनच्या समर्थनार्थ मोर्चे काढले आणि शांततेची मागणी केली. दुसरीकडे जर्मनीतील बर्लिन येथेही असाच मोर्चा काढण्यात आला. तेथील लोकांनी देखील रशियाशी वाटाघाटी करून तोडगा काढण्याची मागणी केली.