तंत्रज्ञानाच्या प्रगतीची भरारी...!

Digital India तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे वस्तू आटोपशीर

    दिनांक :27-Feb-2023
Total Views |
वेध
- नितीन शिरसाट
Digital India २१ व्या शतकात तांत्रिक नवकल्पनांमुळे जगभरात वैचारिक, भौगोलिक आणि आर्थिक परिणामांचे एक वादळ निर्माण झाले आहे. त्यामुळे नवी आव्हाने उभी ठाकली आहेत. Digital India  ज्या सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या मक्तेदारीने जुन्या पिढीला त्रास सहन करावा लागला, त्या आजच्या डिजिटल सुविधांच्या केंद्रिकृत स्वरूपात प्रकट झाल्या आहेत. Digital India जगाला तिस-या प्रकारच्या सार्वजनिक सुविधांची गरज आहे. Digital India भारताच्या लोकशाही तत्त्वांसह बंदरे, रस्ते, रेल्वे, विमान वाहतुकीशिवाय दूरसंचार, भ्रमणध्वनी अ‍ॅप सुविधा, दळणवळण साधनांच्या प्रगतीचा आलेख उंचावला जात आहे.
 

digi 
 
Digital India मूलभूत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा लोकांच्या पैशांच्या आणि माहितीच्या प्रवाहात मध्यस्थी करतात. डिजिटल ओळखपत्र प्रणालीद्वारे कमीत कमी वेळेत व जलद गतीने भ्रमणध्वनीच्या द्वारे पैशाची देवाण-घेवाण करतात. सुविधांचा लाभ प्रत्यक्षात आणण्यासाठी, माहिती नियंत्रित करण्याची वास्तविक क्षमता असलेल्या नागरिकांना सक्षम करण्यासाठी, संमती आधारित माहितीद्वारे वैयक्तिक माहितीचा प्रवर्ग या तीनही मूलभूत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा विकसित करणारा भारत हा पहिला देश बनला आहे. Digital India जगाला विविध प्रकारच्या सॉफ्टवेअर्ससंबंधीच्या इतर सेवा पुरवण्यामध्ये भारत कायमच आघाडीवर राहिलेला आहे. परंतु, आता या साधनांचा वापर आपल्या देशासाठी आणि देशामध्येच होण्याचे प्रमाण वाढते आहे. Digital India तंत्रप्रणालींच्या संयोगांमुळे विशेषतः चित्र, ध्वनी आणि माहितीच्या एकत्रित वापरामुळे एकात्मिक माहिती, संवाद आणि करमणुकीचे एक वेगळेच दालन उघडले आहे.
 
 
बोललेल्या शब्दांचे मजकुरात तर मजकुराचे आवाजात रूपांतर करणे अगदी सहज शक्य झाल्याने आणि यंत्रांची भाषांतर क्षमता वाढल्याने या क्षेत्रात असंख्य नवीन संधी उपलब्ध होतील. Digital India महत्त्वाचे म्हणजे, लाखो निरक्षर व्यक्तींना या तंत्रज्ञानाचा फायदा मिळेल. आज शहरी व ग्रामीण भागातील बहुसंख्य नागरिकांना संगणकाशिवाय आयुष्याची कल्पनाही करता येणार नाही. पूर्वी आपल्याकडे घरोघरी रेडिओ, डीव्हीडी प्लेअर, टेपरेकॉर्डर अशी वेगवेगळी साधने असायची. Digital India गेल्या २० वर्षांपूर्वीदेखील संगणकाचा आपल्या दैनंदिन जीवनाच्या सर्व उपांगांमध्ये इतक्या विविध प्रकारे शिरकाव झालेला नव्हता; तो कार्यालयाच्या किंवा  फार क्वचित घरातील टेबलावर बसून त्याला दिलेले काम करताना दिसे. Digital India परंतु, आता तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आणि सूक्ष्मरूपामुळे (नॅनो टेक्नोलॉजी) संगणकाचे स्वरूप आमूलाग्र बदलले आहे. Digital India इतर अनेक इलेक्ट्रॉनिक साधनांमध्ये मिसळलेल्या सर्वसमावेशक आणि एकात्मिक रूपात तो दिसू लागला आहे.
 
 
Digital India तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे वस्तूंचा आकार आटोपशीर बनला आणि त्याची कार्यक्षमता वाढली. नेहमीच्या वापरातल्या भ्रमणध्वनीचे उदाहरण घ्या. मिळणा-या सुविधांची संख्या किती वेगाने वाढत चालली आहे. बरीचशी कामे ‘ऑनलाईन' होऊ घातल्याने सर्व सुविधा आज सहज सुलभ तत्काळ झालेल्या आहेत. Digital India याशिवाय जमीन मोजणी वेगाने होण्यासाठी ३० सेकंदात अचूक मोजणी करणारे रोव्हर यंत्र खरेदी करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे. सद्य:स्थितीत भूमी अभिलेख विभागाकडून इटीएस यंत्राच्या साह्याने मोजणी केली जाते. Digital India त्याद्वारे जीपीएस रीडिंग घेऊन संबंधित क्षेत्राचे अक्षांश व रेखांश घेतले जातात. या यंत्रणेमुळे जीपीएस रीडिंग सुमारे ३० सेकंदामध्ये घेता येते. Digital India त्यामुळे जमीन मोजणीची प्रलंबित प्रकरणे वेगाने मार्गी लागणार आहेत. तसेच ड्रोन कॅमेराद्वारे रस्ते, रेल्वे, सिंचन विभागाच्या कामांच्या स्थळांचे निरीक्षण केले जात आहे.
 
 
देशात कोरोना काळात अनेक बाधितांना बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, इंजेक्शनसारख्या अत्यावश्यक गोष्टी मिळविणे कठीण झाले होते. परंतु केंद्र सरकारने ई-संजीवनी अ‍ॅप तयार केले. Digital India या अ‍ॅपच्या माध्यमातून रुग्णाला घरबसल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने विविध दुर्धर आजारांवर उपचार घेता येत आहेत. भारताची ही डिजिटल प्रगती जागतिक स्तरावर कौतुकास्पद ठरली जात आहे. Digital India समाजाच्या लोकसहभागातून देशाची प्रगती होत असल्याच्या अभिमानाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात' या जनसंवादाच्या माध्यमातून आवर्जून उल्लेख केला आहे. Digital India तंत्रज्ञानाच्या विकासात उंच भरारी घेऊन भारताला महासत्ता बनविण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.
 
९८८१७१७८२८