नवी दिल्ली,
एस्सार समूहाने (Essar invest) सोमवारी यूके आणि भारतातील कमी कार्बन ऊर्जा संक्रमण प्रकल्पांमध्ये पुढील पाच वर्षांमध्ये ग्रीन हायड्रोजन आणि अमोनियाच्या उत्पादनासह 3.6 अब्ज अमेरिकन डॉलर्स गुंतवणुकीची घोषणा केली. ऊर्जा, धातू आणि खाणकाम, पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूक केलेल्या एस्सार समूहाने उत्तर पश्चिम इंग्लंडमध्ये यूकेचे आघाडीचे ऊर्जा संक्रमण केंद्र निर्माण करण्यासाठी एस्सार एनर्जी ट्रान्सन्झिशन (ईईटी) ची स्थापना करण्याची घोषणा केली.
ईईटीने पुढील पाच वर्षांमध्ये कमी (Essar invest) कार्बन ऊर्जा संक्रमण प्रकल्पांची श्रेणी विकसित करण्यासाठी एकूण 3.6 अब्ज अमेरिकन डॉलर्स गुंतवण्याची योजना आखली आहे. ज्यापैकी 2.4 अब्ज अमेरिकन डॉलर्स लिव्हरपूल आणि मँचेस्टर दरम्यान स्टॅनलो येथे त्याच्या साईटवर आणि 1.2 अब्ज अमेरिकन डॉलर्स गुंतवले जाईल.
या (Essar invest) प्रकल्पांमध्ये यूकेमधील व्हर्टेक्स हायड्रोजनद्वारे 1 गिगावॅट ब्लू हायड्रोजन प्रकल्प, यूके आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी लक्ष्यित 1 गिगावॅट ग्रीन अमोनिया सुविधा विकसित करण्याचा समावेश असेल. व्हर्टेक्स यूकेमधील एस्सारच्या स्टॅनलो रिफायनरी कॉम्प्लेक्समध्ये हायड्रोजन उत्पादन युनिट बांधत आहे. या युनिटमध्ये एस्सार ऑईल बि‘टनची 90 टक्के भागीदारी आहे. दोन युनिट्समधून 2026 पासून दरवर्षी 1 गिगावॅट हायड्रोजन तयार होईल.