राजस्थान महाविद्यालयात मराठी भाषा दिवस संपन्न

- मराठी भाषेच्या उज्वल परंपरेला जिवंत ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा : प्रा. जोत्सना जोशी

    दिनांक :27-Feb-2023
Total Views |
वाशीम, 
Marathi Language Day : मराठी भाषेच्या उज्वल परंपरेला जिवंत ठेवण्यासाठी आपण सर्वानी प्रयत्न करावा, असे प्रतिपादन मराठी विभाग प्रमुख प्रा.ज्योत्स्ना जोशी यांनी केले. राजस्थान महाविद्यालय वाशीम येथे २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिवस संपन्न झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
 
Marathi Language Day
 
कुसुमाग्रजांच्या जन्मदिनाच्या दिवशी दरवर्षी मराठी भाषा दिवस साजरा केला जातो. यावर्षी सुद्धा विद्यार्थ्यांच्या मोठ्या उपस्थितीत महाविद्यालयामध्ये मराठी भाषा दिवस संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एफ.पगारिया होते. त्यांनी याप्रसंगी मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी जास्त जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर करावा व भाषा समृद्ध करावी, असे सांगितले. प्रमुख उपस्थितीत विज्ञान विभाग प्रमुख डॉ. हेमंतकुमार वंजारी होते. त्यांनी इंग्रजी भाषा बोलावी परंतु मराठीकडे दुर्लक्ष करू नये, असे आवर्जून सांगितले. डॉ. शशी पवार यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती. त्यांनी कुसुमाग्रजांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अस्वस्थ तांडाकार डॉ.विजय जाधव यांनी केले तर आभार डॉ. दिनेश इंगळे यांनी मानले.