श्रीक्षेत्र डव्हा ते माहूरगड पायदळ पालखीचे किन्हीराजा येथे स्वागत

    दिनांक :27-Feb-2023
Total Views |
मालेगाव, 
तालुयातील श्रीक्षेत्र डव्हा येथील श्री नाथ नंगे महाराज विश्वमंदीर संस्थान यांच्या पायदळ पालखी (Palakhi) सोहळ्याचे तालुयातील किन्हिराजा येथे आगमन होताच ग्रामस्थांच्या वतीने पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
 
Palakhi
 
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री नाथ नंगे महाराज संस्थान विश्व मंदीर डव्हा यांचे वतीने २३ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२३ पर्यंत विश्व मंदीर डव्हा ते माहूरगड पादळ पालखी सोहळ्याचे आयोजन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. २३ फेब्रुवारी रोजी डव्हा येथून माहूरगड जाण्याकरीता शेकडो भाविक भक्तासह श्री नाथ नंगे महाराज यांचा पायदळ पालखी सोहळा माहूरगडाकडे मार्गस्थ झाला. हा पायदळ पालखी सोहळा अवलिया महाराज संस्थान काळामाथा येथे मुक्काम करुन २४ फेब्रुवारी रोजी सकाळी किन्हिराजा येथे पोहचला असता ग्रामस्थांच्या वतीने या पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
 
 
त्यानंतर गावातून पालखीची टाळ मृदंगाच्या गजरात मिरवणुक काढण्यात आली. मिरवणूकी नंतर गणेश नागरे व त्यांच्या परिवाराकडून श्री नाथ नंगे महाराजांच्या पालखीची पुजा अर्चा करण्यात आली. तसेच गणेश नागरे यांच्या कडून संत सखुमाता संस्थानमध्ये पालखी सोहळ्यातील भाविक भक्ताची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. जेवण झाल्यानंतर हा पायदळ पालखी सोहळा मैराळडोह मार्गे पुढील मुक्कामासाठी मार्गस्थ झाला. या पालखी सोहळ्याचे यावर्षी ४६ वे वर्ष असून, शेकडो भाविक या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले आहेत.