हिरकणी कक्षाची दुरवस्था पाहून सरोज अहिरेंचा काढता पाय

27 Feb 2023 18:51:23
मुंबई, 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Saroj Ahire) आमदार सरोज अहिरे बाळाला घेऊन विधिमंडळात दाखल झाल्या. मात्र, बाळाला ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या हिरकणी कक्षात सोयी सुविधा नसल्याने त्यांना काही वेळातच विधिमंडळातून काढता पाय घ्यावा लागला. हिरकणी कक्षाची दुरवस्था पाहून सरोज अहिर यांनी नाराजी व्यक्त केली.
 
Saroj Ahire
 
हिरकणी कक्षाची अवस्था पाहून सरोज अहिरे यांच्या डोळ्यात पाणी आले. नागपूर अधिवेशनात सरोज अहिरे लहान बाळाला घेऊन आल्यानंतर त्यांच्यासाठी हिरकणी कक्षाची व्यवस्था करण्यात आली होती. या अधिवेशनालाही (Saroj Ahire) सरोज अहिरे बाळाला घेऊन आल्या आहेत. परंतु, हिरकणी कक्ष खराब असल्याने विधिमंडळातून काढता पाय घेतला. हिरकणी कक्षाची अवस्था पाहून आहिरे यांनी प्रश्न उपस्थित केले. माझ्या मतदारसंघातील लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी या अधिवेशनात माझ्या लहान मुलाला घेऊन आली आहे. माझ्या मागण्यांची योग्य दखल घेतली नाही तर, मला पुन्हा माझ्या मतदारसंघात जावे लागेल, असे सरोज अहिरे म्हणाल्या.
 
 
लोकप्रतिनिधींसोबत लहान मुले असतील, त्यांच्यासाठी हिरकणी कक्ष सुरू करण्यात आलेला आहे. सचिवांना या संदर्भात पत्र देखील दिले होते. मात्र, हे सर्व करूनही हिरकणी कक्षात प्रचंड धूळ आहे. कक्षातील सोफे देखील फाटलेले आहेत. त्या ठिकाणी मी माझ्या बाळाला कस ठेवणार? शौचालयाची देखील व्यवस्था करण्यात आलेली नाही. यात आज बदल केले नाहीत तर, मला पुन्हा मतदारसंघात जावे लागेल, असे (Saroj Ahire) अहिरे यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0