जलयुक्त शिवार योजना टप्पा दोनमुळे गावे जलसमृद्ध होणार

28 Feb 2023 21:50:00
तभा वृत्तसेवा
मुंबई, 
शेतकर्‍यांच्या जमिनी जलसमृद्ध (Jalyukta Shivar Yojana) करून देणारे जलयुक्त शिवार अभियानाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. या योजनेत पाच हजार गावांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेमुळे गावे जलसमृद्ध होणार आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले. यासंदर्भात यशोमती ठाकूर यांनी तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता.
 
Jalyukta Shivar Yojana
 
मुख्यमंत्री म्हणाले की, अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे व नदीकाठच्या गावांचेही नुकसान झाले. (Jalyukta Shivar Yojana) बाधित ब्राह्मणवाडा भगत, शिराळा व यावली येथील खोलीकरण तसेच बांध दुरुस्तीच्या कामास जिल्हा नियोजन समितीने प्रशासकीय मान्यता दिली असून, सद्यस्थितीत कामे प्रगतीपथावर आहेत. उर्वरित कामे जलयुक्त शिवार अभियान दोनमध्ये घेण्याचे प्रस्तावित आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी लेखी उत्तरात सांगितले. मंत्री तानाजी सावंत म्हणाले की, जलयुक्त शिवार योजना एकमुळे विदर्भ, मराठवाड्यातील भूजल पातळीत वाढ झाली आहे.
 
सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारकास शासनाचे प्राधान्य : मुख्यमंत्री
पुणे येथील भिडे वाड्यात सावित्रीबाई फुले यांचे (Jalyukta Shivar Yojana) राष्ट्रीय स्मारक करण्याबाबत शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून, स्मारकाचे काम मार्गी लागावे यासाठी मालक, विकासक व भाडेकरू यांच्यासमवेत बैठक घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. भिडे वाडा भूसंपादनासंदर्भात हडपसरचे विधानसभा सदस्य चेतन तुपे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. मुख्यमंत्री म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक हा अस्मितेचा विषय आहे. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
Powered By Sangraha 9.0