अकोला,
जवाहर नवोदय विद्यालय Navodaya Vidyalaya निवड चाचणी परीक्षेसाठी बुधवार, 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यातील इयत्ता पाचवीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य आर. एस. चंदनशिव यांनी केले आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी Navodaya Vidyalaya अद्यापर्यंत अर्ज केले नाहीत अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज संकेतस्थळावर करावा. तसेच आवेदन पत्रातील चुका दुरुस्त करण्यासाठी16 व 17 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन खिडकी उपलब्ध राहणार आहे. तरी संबंधितानी मिळालेल्या रजिस्ट्रेशन नंबरने लॉगिन करुन अर्जामधील लिंग, जात, प्रवर्ग, क्षेत्र, अपंगत्व व परीक्षेचे माध्यमामध्ये दुरुस्ती करुन घ्यावी. अधिक माहितीसाठी जवाहर नवोदय विद्यालय, बाभुळगाव जहा., अकोला येथे अथवा 0724-2991087 दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य यांनी केले आहे.