दारव्हा येथे गजानन महाराज संस्थानचा प्रगटदिन महोत्सव

08 Feb 2023 19:05:13
तभा वृत्तसेवा
दारव्हा, 
येथील गजानन महाराज Gajanan Maharaj Sansthan संस्थानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे 23 वा प्रगटदिन महोत्सव सोमवार, 6 फेब्रुवारी ते सोमवार, 13 फेब्रुवारी आयोजन केले आहे. 29 जानेवारी ते 4 फेब्रुवारीला गजानन विजय ग‘ंथाचे सामूहिक पारायण करण्यात आले.
 
Gajanan Maharaj Sansthan
 
संगीतमय श्रीमद्भागवत कथा सोनाली महाजन Gajanan Maharaj Sansthan आळंदी यांच्या अमृत वाणीतून होणार आहे. या प्रगटदिन महोत्सव 6 फेब्रुवारीला सकाळी 8 वाजता संस्थानचे अध्यक्ष डॉ. मदन पोटफोडे यांनी सपत्नीक कलशस्थापना केली आहे. दररोज संध्याकाळी 6 वाजता हरीपाठ रात्री 7 वाजता कीर्तन महोत्सवात मोरेश्वरमहाराज गोरे (आळंदीकर) शिवाजी महाराज बावस्कार (जळगावजामोद), किशोर महाराज कोकाटे शिवचचित्रकार नगर, विलासमहाराज गेजगे (परभणी), मुकेशमहाराज पिंप्रीकर (जळगाव), मोहन महाराज आळंदीकर, मठाधिपती राधाकृष्ण मंदिर सेवाग‘ाम आश्रम, मंदारमहाराज शास्त्री (नाशिक) यांचे काल्याचे कीर्तन तसेच 13 फेब्रुवारीला रात्री 7 वाजता श्रीकृष्ण महाराज जोगदंड यांचे भारूड होणार आहे.
 
 
13 फेब्रुवारीला दुपारी 2.30 पासून महाप्रसादाचे Gajanan Maharaj Sansthan वितरण करण्यात येईल. वरील सर्व कार्यक्रमांचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष डॉ. मदन पोटफोडे तसेच सर्व पदाधिकार्‍यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0