वारंगल,
महेंद्र कर्मा यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या ‘सलवा जुडूम’चे (Madhukar Rao) प्रणेते मुधकर राव यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर तेलंगणातील वारंगल येथे उपचार सुरू होते. नक्षलवादाविरोधात आवाज बुलंद करणारा चेहरा म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पार्थिवावर छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यातील कुटरू गावात अन्त्यसंस्कार करण्यात आले.
‘सलवा जुडूम’ हा गोंडी या प्रादेशिक आदिवासी भाषेतील शब्द आहे. याचा अर्थ ‘शांतीचा वाहक’ असा होतो. 2013 मध्ये सुकमा येथे माओवाद्यांच्या हल्ल्यात मारले गेलेले (Madhukar Rao) काँग्रेसचे नेते महेंद्र कर्मा यांना ‘सलवा जुडूम’चे जनक मानले जातात. महेंद्र कर्मा यांनी 2005 मध्ये सलवा जुडूम मोहीम सुरू केली, जेव्हा छत्तीसगडमध्ये नक्षलवादी घटना वाढू लागल्या होत्या. नक्षलवादी किंवा माओवाद्यांशी लढण्यासाठी सामान्य लोकांचा सहभाग सुनिश्चित करणे हा यामागील उद्देश होता.