Pakistan तुर्कस्तान आणि सीरियातील भूकंपानंतर संपूर्ण जग हादरले आहे. भूकंपामुळे 8 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हजारो लोक जखमी झाले असून अनेक अजूनही ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत. या नैसर्गिक आपत्तीनंतर तुर्कस्तान आणि सीरियाच्या मदतीसाठी संपूर्ण जग पुढे आले आहे. भारतने मदतीसाठी एनडीआरएफ टीम, डॉक्टर्स, मेडिकल टीम, तात्पुरते हॉस्पिटल यासह मोठ्या प्रमाणात मदत सामग्री पाठवली आहे. यासोबतच खडतर परिस्थितीतून जात असलेल्या पाकिस्ताननेही मदत पाठवण्याची तयारी दर्शवली, मात्र तुर्कस्तानने त्याला चांगलेच फटकारले.
या भेटीची माहिती पाकिस्तानच्या Pakistan माहिती मंत्री मरियम औरंगजेब यांनी दिली. त्यांनी एका ट्विटमध्ये सांगितले की, पंतप्रधान बुधवारी सकाळी अंकाराला रवाना होतील. भूकंपामुळे झालेल्या विध्वंस, जीवितहानी आणि तुर्कस्तानच्या लोकांबद्दल ते राष्ट्राध्यक्ष (रेसेप तय्यिप) एर्दोगान यांना शोक व्यक्त करतील, असे ते म्हणाले. दरम्यान पंतप्रधानांच्या तुर्की दौऱ्यामुळे गुरुवारी बोलावण्यात आलेली एपीसी पुढे ढकलण्यात आली असून, मित्रपक्षांशी चर्चा करून नवीन तारीख जाहीर केली जाईल.