धानोरा येथील सुंदर नारायण यात्रेला प्रारंभ

सुंदर नारायण व भरत भेटीनंतर फुटली दहीहंडी

    09-Feb-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
अचलपूर,
अचलपूर शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या धानोरा पूर्णा येथे Sundar Narayan Yatra सुंदर नारायण यात्रेला प्रारंभ झाला आहे. नारायण व भरत भेटीने गावाबाहेर एका चिंचेच्या झाडाखाली काल्याच्या कीर्तन होऊन दहीहंडी फोडण्यात आली. आठ ते दहा दिवस चालणार्‍या या यात्रेत सोयरीक संबंधाविषयी बोलणी सुरू करण्याची प्रथा अनेक वर्षापासून आहे. लग्न कार्य जुळवणारी यात्रा म्हणून देखील ही पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.
 
Sundar Narayan Yatra
 
चांदूर बाजार तालुक्यातील धानोरा पूर्णा येथील Sundar Narayan Yatra सुंदर नारायण यात्रेला प्रारंभ झाला आहे. चांदूर बाजार, अचलपूर, दर्यापूर या तालुक्यातील हजारो नागरिक या यात्रेत सहभागी होत असतात. धानोरा पूर्णा येथील सुंदर नारायण यात्रेत पूर्णा नदीकाठच्या चिंचेचा झाडाला विशेष महत्त्व आहे. सुंदर नारायण व भरत भेट दहीहंडीचा साक्षीने होत असते. यावेळी मंदीरात भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. दरवर्षीही ही यात्रा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत भरत असते. भगवान सुंदर नारायणांना पालखीत बसवुन मंदिरातून चिचेच्या झाडाजवळ आणण्यात येते. त्या ठिकाणी चिंचेचा झाडाखाली भरत व भगवान सुंदरदारांची भेट घातली जाते. त्या भेटीस भरत भेट म्हणतात. त्या ठिकाणी पूजा अर्चना केल्यानंतर काल्याचे किर्तन होऊन दहीहंडी फोडण्यात येते. तत्पूर्वी Sundar Narayan Yatra मंदिरात असलेला भव्य दिव्य पुरातन रथ भाविक ओढत ओढत संपूर्ण गावाची प्रदक्षिना घालतात. या शोभायात्रे सहभागी होण्याकरिता जिल्हाभरातील हजारो नागरिक येतात. यात्रे दरम्यान राजना व धानोरा या जुळ्या गावात घरोघरी रोडगे करण्याची परंपरा आहे. यात्रेसाठी येणार्‍या नातेवाईकांनाही रोडग्याचेच जेवण दिले जाते.
 
 
परंपरा लोप पावत आहे
200 वर्षाची परंपरा ही यात्रा लग्नकार्यासाठी अत्यंत महत्त्वाची समजली जायची. Sundar Narayan Yatra यात्रेदरम्यान लग्नाला आलेल्या मुला-मुलीचे वडील, मामा, काका, आजोबा तसेच इतर नातेवाईक बघण्याच्या कार्यक्रमाच्या तारखा ठरवत असत. परंतु, काळाच्या ओघात गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून ही परंपरा लोप पावत आहे. संपर्क क्रांती (मोबाईल) होण्याच्या पूर्वी ही परंपरा कायम होती.