नवी दिल्ली,
Gujarat Darshan : भारतीय रेल्वेच्या भारत गौरव टुरिस्ट ट्रेन अंतर्गत धावणारी 'गर्वी गुजरात' (Garvi Gujarat) एसी स्पेशल ट्रेन आज दिल्लीहून रवाना झाली. ही ट्रेन इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) द्वारे संचालित केली जात आहे. ही ट्रेन तुम्हाला गुजरातमधील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी घेऊन जाईल. यावेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह पुरुषोत्तम रुपाला, दर्शना जरदोश प्रामुख्याने उपस्थित होते.
गुजरातचा सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वारसा दाखवण्यासाठी (Gujarat Darshan) 'गर्वी गुजरात'चा (Garvi Gujarat) दौरा सुरू आहे. स्वातंत्र्यसैनिक सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवन संकल्पनेवर आधारित 'एक भारत श्रेष्ठ भारत' योजनेअंतर्गत या ट्रेनची रचना करण्यात आली आहे. या ट्रेनद्वारे तुम्ही तुमच्या सोयीनुसार गुरुग्राम, रेवाडी, रिंगास, फुलेरा आणि अजमेर रेल्वे स्थानकांवर चढू आणि उतरू शकाल. 23 नोव्हेंबर 2021 रोजी भारतीय संस्कृती आणि वारसा जाणून घेण्यासाठी पंतप्रधानांच्या दूरदृष्टीने भारत गौरव धोरण सुरू करण्यात आले. आतापर्यंत 16 भारत गौरव गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. गर्वी गुजरात ही १७वी ट्रेन आहे.
भारत गौरव डिलक्स एसी टुरिस्ट ट्रेन (Garvi Gujarat) 'गर्वी गुजरात' (Gujarat Darshan) 3500 किलोमीटरचे अंतर कापेल. यामध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ, चंपानेर पुरातत्व उद्यान आणि पाटणमधील राणी की वाव यांचा समावेश आहे. यासोबतच अहमदाबादमधील अक्षरधाम मंदिर, साबरमती आश्रम, मोढेरा सूर्य मंदिर, सोमनाथ ज्योतिर्लिंग, नागेश्वर ज्योतिर्लिंग, द्वारकाधीश मंदिर आणि बेट द्वारका या प्रमुख ठिकाणांना भेटी देण्यात येणार आहेत. भारत गौरव डिलक्स एसी ट्रेनचे प्रति व्यक्ती तिकीट एसी 2 टियरमध्ये 52,250 रुपये आहे. AC 1 (केबिन) साठी 67,140 प्रति व्यक्ती. AC 1 (कूपा) साठी 77,400 प्रति व्यक्ती. तिकिटाच्या किमतीत एसी हॉटेल्समध्ये रात्रीचा मुक्काम, फक्त शाकाहारी जेवण, बसमधून प्रेक्षणीय स्थळे पाहणे, मार्गदर्शक सेवा आणि प्रवास विमा यांचा समावेश होतो.