स्त्री-पुरुष संयुक्त मालकी हक्क जाणीव जागृतीपर कार्यशाळा

    दिनांक :11-Mar-2023
Total Views |
गोंदिया, 
नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला Awareness उधम प्रकल्पांतर्गत 8 मार्च रोजी लोक संचालित साधन केंद्र व्यवस्थापक व सहयोगिनी करिता स्त्री-पुरुष संयुक्त मालकी हक्क कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन न्या. एस.व्ही. पिंपळे यांनी केले. स्त्री- पुरुष समानतेची जाणीव जागृती समाजातील प्रत्येक घटकात आणणे ही आपणा सर्वांची नैतिक जबाबदारी आहे असे मत न्यायाधीश पिंपळे यांनी यावेळी व्यक्त केले.
 
fct
 
 
विधी सेवा प्राधिकरण गोंदिया Awareness यांच्या वतीने महिलांच्या आर्थिक, सामाजिक व न्यायिक विकासाकरिता विविध योजनांची माहिती सर्वांना व्हावी अशी रचना गोंदिया जिल्ह्यात करण्यात येत आहे. कार्यशाळेचे प्रास्ताविक माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय संगेकर यांनी केले. कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून अ‍ॅड. रंजिता शुक्ला यांनी जागतिक महिला दिनानिमित्य स्त्री-पुरुष संयुक्त मालकी हक्क जाणीव-जागृती कार्यशाळेच्या माध्यमातून महिला व तिचे हक्क याबाबत कायद्याची परिभाषा साध्या सोप्या भाषेमध्ये वर्णन केली. उदाहरणादाखल त्यांनी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या योजनेची माहिती देत खरेदी व विक्री व्यवहारामध्ये महिलांच्या नावे व्यवहार केल्यास एक टक्के मुद्रांक शुल्क सूट देण्यात येते. करिता याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यशाळेला समाजकार्य महाविद्यालयाच्या प्रा. संगीता घोष, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर, के.व्ही.के. हिवरा चे वरिष्ठ संशोधक डॉ. सैय्यद अली उपस्थित होते. या कार्यशाळेत गोंदिया जिल्ह्यातील 7 सी.एम.आर.सी. कार्यक्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणार्‍या 17 तेजस्विनी महिलांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी सहायक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड, लेखाधिकारी योगेश वैरागडे, सहायक सनियंत्रण अधिकारी प्रदिप कुकडकर, सहाय्यक प्रफुल अवघड, एमआयएसचे रामेश्वर सोनवाने, उपजीविका सल्लागार हेमंत मेश्राम, एमआयएस सल्लागार तृप्ती चावरे व मदतनीस प्रीती जेंगठे यांनी परिश्रम घेतले.