दारव्हा,
तालुक्यातील वडगाव (गाढवे) येथे (Banjara Lengi competition) बंजारा लेंगी स्पर्धा घेण्यात आली. त्यात भोपापूर येथील रसपूत बंजारा लेंगी मंडळाने बाजी मारली. बंजारा बोलीभाषा, पोशाख, संस्कृतीचे सादरीकरण लेंगीच्या माध्यमातून करण्यात आले. स्पर्धेत पुरुष विभागात प्रथम बक्षीस रजपूत बंजारा लेंगी मंडळ, भोपापूरने पटकाविले. दुसरे बक्षीस भुली तांडा, तृतीय बक्षीस सेवालाल महाराज लेंगी मंडळ, वरोली, चतुर्थ बक्षीस भानुदास लेंगी मंडळ, बोरगाव व डोल्हारी देवी यांनी मिळविले.
महिला विभागात (Banjara Lengi competition) प्रथम जय जगदंबा लेंगी मंडळ, रुई, द्वितीय चेलका तांडा, तृतीय सावरगाव, तर चतुर्थ बक्षीस खेड (बीड) येथील मंडळाने प्राप्त केले. जय सेवालाल महिला लेंगी मंडळ, वडगाव गाढवे यांनी लेंगी नृत्य सादर करून प्रोत्साहनपर बक्षीस पटकाविले. लेंगी स्पर्धेत पालकमंत्री संजय राठोड, आमदार मदन येरावार, महंत कबीरदास महाराज, महंत जितेंद्र महाराज आणि दुसर्या सत्रात खासदार भावना गवळी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी न्यू सेवालाल मंडळ, तरुण युवा मंडळ आणि गावकर्यांनी परिश्रम घेतले.