तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
येथील रजनी पार्क परिसरातील (Sakhi Mahila Bhajani Mandal) सखी महिला भजनी मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शुक्रवार, 10 मार्च रोजी साजरी करण्यात आली. मंडळाच्या महिलांनी भजन, पोवाडा, पाळण इत्यादींची सादरीकरण केले.
पिंपळगाव परिसरातील रजनी पार्क येथील (Sakhi Mahila Bhajani Mandal) सखी महिला भजनी मंडळाच्या महिला प्राची गुळवे, आरती यादव, गीता लोणबळे, रूपाली गुळवे, इंगळकर, सुषमा गवळी, कल्पना बोरखडे, राणी पहाडे, सुजाता जयस्वाल, विजया बानोरे, सुमित्रा वर्मे, ज्योत्स्ना भिसेन इत्यादी महिलांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती शुक‘वार, 10 मार्च रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली. यावेळी महिलांनी भजन तसेच पोवाडे, पाळणी आदींचे सादीकरण केले. परिसरातील महिला मोठ्या संख्येने कार्यक्रमात उपस्थित होत्या.