संपात अर्ज, निवेदने द्या जिल्हाधिकारी कार्यालयात

- जिल्हाधिकार्‍यांनी घेतला आढावा

    दिनांक :13-Mar-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा 
वर्धा, 
Collector's Office : राज्य सरकारी कर्मचार्‍यांचा आपल्या विविध मागण्यांसाठी उद्या मंगळवार 14 मार्चपासून संप आहे. या संप काळात सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी आज 13 रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी विभागप्रमुखांनी दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी दिले.
 
Collector's Office
 
संपात विविध शासकीय कार्यालयांचे कर्मचारी सहभागी होत आहे. त्यामुळे आपल्या कामानिमित्त आलेल्या नागरिकांची होणारी गैरसोय टाळणे आवश्यक आहे. शासकीय कार्यालयात आपले अर्ज, निवेदने देण्यासाठी किंवा अन्य कामांसाठी आलेल्या नागरिकांना संबंधित कार्यालयात संपामुळे अर्ज, निवेदने देणे शक्य नसल्यास किंवा संबंधित कार्यालयात संबंधित व्यक्ती उपस्थित नसल्यास अशा वेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील (Collector's Office) सेवादूत कक्षात नागरिकांना अर्ज, निवेदने किंवा अन्य काही प्रकारचे म्हणणे असल्यास लेखी स्वरूपात सादर करता येतील. जिल्हाधिकारी कार्यालयातील सेवादूत कक्ष कार्यालयीन वेळेत पुर्ववेळ सुरू राहणार आहे.