ईडीच्या विरोधात मुश्रीफ हायकोर्टात

13 Mar 2023 20:40:12
मुंबई, 
अंमलबजावणी संचालनालयाने दाखल (Hasan Mushrif) केलेले बेकायदेशीर सावकारीचे प्रकरण रद्द करण्यात यावे, अशी मागणी करीत माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
 
Hasan Mushrif
 
ईडीने त्यांच्या विरोधात छापेमारी केली असून, त्यांना समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहण्याचा आदेश दिला होता. मुश्रीफ यांचे मुलगे नाविद, आबिद आणि साजिद हे संचालक किंवा भागधारक असलेल्या सर सेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरी प्रा. लि. ला दोन कंपन्यांकडून भरीव व्यवसाय नसताना अनेक कोटी रुपयांचा संशयास्पद प्रवाह असल्याचा दावा ईडीने केला होता. हसन मुश्रीफ यांची याचिका दाखल करून घेत न्या. रेवती मोहिते डेरे यांनी त्याच्यावर उद्या मंगळवारी सुनावणी केली जाईल, असे सांगितले. या याचिकेत (Hasan Mushrif) मुश्रीफ यांनी त्याचे राजकीय विरोधक किरीट सोमय्या यांच्यावर आऱोप केले आहेत.
Powered By Sangraha 9.0