रामचंद्र पौडेल नेपाळच्या राष्ट्राध्यक्षपदी आरुढ

    दिनांक :13-Mar-2023
Total Views |
काठमांडू, 
नेपाळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते (Ramchandra Poudel) रामचंद्र पौडेल यांनी सोमवारी नेपाळचे तिसरे राष्ट्राध्यक्ष म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय ‘शीतल निवास’ येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात प्रभारी सरन्यायाधीश हरीकृष्णा यांनी पौडेल यांना शपथ दिली.
 
Ramchandra Poudel
 
शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान पुष्पकमल दहल, सभापती देवराज घिमिरे, नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष गणेश प्रसाद तिमिलसिना आणि इतर उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. नेपाळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते पौडेल यांची राष्ट्रपतीपदासाठी गुरुवारी निवड करण्यात आली. या निवडणुकीत त्यांनी सीपीएन-यूएमएलचे सुभाषचंद्र नेम्बांग यांचा पराभव केला. पौडेल यांना 33,802 तर, नेम्बांग यांना 15,518 मते मिळाली होती. माजी सभापती आणि मंत्रिपदे भूषवलेले पौडेल (Ramchandra Poudel) यांनी देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचण्यासाठी दीर्घ राजकीय प्रवास केला आहे.