शीतल म्हात्रे बनावट चित्रफित प्रकरण विधानसभेत गाजले

महिला आमदार आक्रमक

    दिनांक :13-Mar-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
मुंबई, 
शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि (Sheetal Mhatre case) उपनेत्या शीतल म्हात्रे यांची समाज माध्यमांवर व्हायरल झालेली मॉर्फ, बनावट चित्रफित प्रकरण सोमवारी विधानसभेत गाजले. महिला आमदार या विषयावरून आक्रमक झालेल्या दिसल्या. आमदार यामिनी जाधव यांनी हा प्रश्न माहितीच्या मुद्याद्वारे विधानसेत उपस्थित केला. प्रतिष्ठित महिला, माजी नगरसेविका असलेल्या महिलेबाबत मोर्चातील व्हिडीओ मॉर्फिंग केला गेला. एका महिलेने किती वेळा प्रसारमाध्यमांसमोर येऊन स्वतःला सिद्ध करायचे, यावर कधी कारवाई होणार, यामुळे तिचे आयुष्य उद्ध्वस्त होईल, असे जाधव म्हणाल्या.
 
Sheetal Mhatre case
 
ही (Sheetal Mhatre case) अतिशय निंदनीय बाब आहे. एका आमदारासोबत कार्यकर्तीचा ज्या पद्धतीने व्हिडीओ मॉर्फिंग करून व्हायरल केला, ती बाब अतिशय निंदनीय आहे. मी सभागृहातील सर्व आमदारांना विनंती करते की, या प्रकरणातील सूत्रधाराचा छडा लावला जावा. आज एका आमदार आणि एका महिलेवर असा आरोप झाला आहे. उद्या ही वेळ तुमच्यावरही येऊ शकते. कारण, कोणताही माणूस कोणत्याही स्तरावर जाऊ शकतो, हे आम्ही या चित्रफितच्या माध्यमातून पाहू शकतो. महापालिकेचे अधिकारी आणि आम्हीही तिथे हजर होतो. असे प्रकार झाले तर, एखाद्या स्त्री किंवा पुरुषांचाही संसार उद्ध्वस्त होऊ शकतो. त्यामुळे यामागचा सूत्रधार कोण आहे, तो शोधून काढा. याआधी सुद्धा याच महिलेविषयी शौचालयात घाणेरडे शब्द लिहिण्याचा प्रकार घडला होता. यावर कारवाई झाली नाही तर, राजकारणात मुली- महिला येणार नाहीत, असे आमदार मनीषा चौधरी म्हणाल्या.
 
 
महिला रस्त्यावर पडलेल्या नाहीत. (Sheetal Mhatre case) राजकारणासाठी तुम्ही बायकांचा वापर करणार का, याबाबत एसआयटी चौकशी करा. या सगळ्यांचे मोबाईल जप्त करा, जेणेकरून संपूर्ण माहिती मिळेल. ज्या कंपन्या, एजन्सी अशा पद्धतीचे काम करीत आहेत, त्या सर्व कंपन्यांची चौकशी लावा, तरच संपूर्ण गोष्टी समोर येतील, असे आमदार भारती लव्हेकर म्हणाल्या.
 
दरम्यान, मनिषा चौधरी यांनी हा कुण्या एका महिलेचा विषय नाही, (Sheetal Mhatre case) समस्त महिला वर्गाचा विषय आहे. याबाबत विरोधी पक्षातील एकानेही बोलू नये, हे दुर्दैव आहे. असे बोलताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, या प्रकरणी सखोल चौकशी व्हावी. अशा प्रकारे कोणाचेही चारित्र्यहनन करणे योग्य नाही. संबंधितांवर योग्य ती कारवाई व्हावी.