मुंबई,
IIT Bombay ने मुंबईतील प्रशासकीय अधीक्षकांच्या रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. पात्र उमेदवार अंतिम दिनांक ९ एप्रिल पूर्वी ऑनलाइन/ऑफलाइन अर्ज करू शकतात. यासाठी पात्र उमेदवारांकडे बॅचलर पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
इच्छुक उमेदवार आयआयटी बॉम्बेच्या (IIT Bombay) अधिकृत वेबसाइटवर भरती, रिक्त पदांची संख्या, निवड प्रक्रिया आणि इतर महत्त्वाचे तपशील तपासू शकतात. प्रशासकीय अधीक्षकांच्या एकूण रिक्त पदांची संख्या 10 आहे. या पदासाठी वेतन श्रेणी 35,400 रुपये ते 142,400 रुपये प्रति महिना आहे. उमेदवारांची पदासाठी निवड झाल्यानंतर त्यांना वेतन श्रेणी कळवली जाईल. भरतीसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे. इच्छुक उमेदवार अंतिम दिनांक ९ एप्रिल पूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात.