पुरातत्त्व विभागाकडून अंबाबाई मूर्तीशी छेडछाड

15 Mar 2023 18:39:28
कोल्हापूर, 
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीची (Ambabai Tample) झीज झाल्याचे समोर आल्यानंतर राज्य पुरातत्त्व विभागाकडून मंगळवारी पाहणी करण्यात आली. मात्र, विभागाने पाहणी करताना श्री अंबाबाईच्या मूर्तीशी छेडछाड केल्याचा आरोप श्रीपुजकांच्या वकिलांनी केला आहे. लेपाचा काही थर काढून टाकल्यानंतर मूर्तीचा चेहरा आणखी खराब झाल्याचे म्हटले आहे. या संदर्भात देवीच्या मूर्तीची दोन छायाचित्रे कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात सादर करण्यात आली.
 
Ambabai Tample
 
श्रीपुजक गजानन मुनीश्वर यांनी (Ambabai Tample) मूर्ती संवर्धन प्रक्रियेबाबत कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी श्रीपुजकांच्या वकिलांनी केंद्रीय पुरातत्त्व विभागाने छेढछाड केल्याचा गंभीर आरोप केला. कोणत्याही परवानगीशिवाय चेहर्‍यावर यापूर्वी लावलेला लेपाचा काही थर काढून टाकला. त्यामुळे मूर्तीचा चेहरा आणखी खराब झाल्याचे समोर आले आहे. केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्‍यांनी बेकायदेशीर कृत केल्याचा दावा श्रीपुजकांच्या वकिलांनी केला आहे.
 
 
दरम्यान, श्री अंबाबाईच्या मूर्तीची(Ambabai Tample)  पुन्हा काही प्रमाणात झीज झाल्याने राज्य पुरातत्त्व विभागाकडून 28 फेब्रुवारी रोजी पाहणी करण्यात आल्यानंतर विभागाला पत्र पाठवण्यात आले होते. या पृष्ठभूमीवर पुरातत्त्व विभागाच्या अधिकारी राजेश्वरी, शिवन्नाकुमार, राम निगम, उत्तम कांबळे यांनी मंदिरात मूर्तीची मंगळवारी पाहणी केली. या संदर्भातील केंद्रीय पुरातत्त्व विभाग लवकरच अहवाल सादर करणार आहे, या अहवालानंतर संवर्धनासंदर्भात पुढील निर्णय होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे. दरम्यान, पाहणीनंतर सद्यःस्थितीत मूर्ती सुरक्षित असून, काही प्रमाणात संवर्धनाची गरज भासल्यास त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना दिल्या जातील, अशी माहिती पुरातत्त्व विभागाने दिल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले आहे.
Powered By Sangraha 9.0