बेंझेमाचा विजयी गोल, रिअल माद्रिद उपांत्यपूर्व फेरीत

    दिनांक :16-Mar-2023
Total Views |
माद्रिद,
Karim Benzema करीम बेंझेमाच्या एकमेव महत्त्वपूर्ण गोलच्या जोरावर रिअल माद्रिदने अंतिम सोळाच्या फेरीत दुसर्‍या चरणाच्या सामन्यात लिव्हरपूलवर 1-0 ने विजय नोंदविला. या विजयाबरोबरच रिअल माद्रिदने एकूण 6-2 अशा सरस गोलफरकाने विजय नोंदवीत चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. फेब‘ुवारी महिन्यात अ‍ॅनफिल्ड येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या चरणाच्या सामन्यात लिव्हरपूलच्या खेळात आत्मविश्वासाचा अभाव असल्याचे प्रकर्षाने दिसत होते.
 
 
KARIM-BENEZMA
 
माद्रिदने लिव्हरपूलला गतवर्षीच्या अंतिम सामन्यात पराभूत केले होते आणि आता अंतिम सोळाच्या सामन्यातील पराभवासह सलग तिसर्‍या हंगामात चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या बाहेर केले. हा एक अवघड सामना होता, परंतु आम्हाला पुढे जायचे आहे, हे निर्धार करून प्रारंभापासून आक‘मक खेळाचे प्रदर्शन केले. त्यामुळेच आम्ही आता उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलो आहे, असे Karim Benzema बेंझेमा या सामन्यानंतर म्हणाला.
 
 
दु:ख हा आजच्या फुटबॉलचा एक भाग आहे. मात्र सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जिंकणे आणि पुढे जाणे. प्रत्येकाला विजय हवा असतो, परंतु त्याकरिता त्रास सहन करावा लागतो, असेही तो म्हणाला. लिव्हरपूलला विजयापासून दूर करण्यासाठी Karim Benzema बेंझेमासह बचावपटू एडर मिलिटो, अ‍ॅण्टोनियो रुडिगर व गोलरक्षक थिबॉट कोर्टोइसने कसोशीने प्रयत्न केले. लिव्हरपूलच्या गोलरक्षक अ‍ॅलिसन बेकरने उत्तम बचावात्मक कामगिरी केल्यामुळे विद्यमान रिअल माद्रिदला आपल्या गोलसंख्येत वाढ करता आली नाही.