दीर्घसूचनेचे कौतुक !

16 Mar 2023 18:36:25
समर्थ नेतृत्व 
- माधव किल्लेदार 
 
Samarth Ramdas Swami अनेक वर्षांपूर्वी एका गावात दुष्काळ पडला होता. लोकांना, जनावरांना प्यायला पाणी मिळत नव्हते. गावातील लोकांकडे कुठल्याही प्रकारचे अर्थार्जन करण्याचे साधन नव्हते. त्यामुळे गावातील काही लोकांनी दुस-या गावांत स्थलांतर करण्याचे ठरवले. Samarth Ramdas Swami गावातील काही जुन्या आणि जाणकार लोकांचा या स्थलांतराला विरोध होता. त्यामुळे गावातील एका वटवृक्षाखाली गावातील तरुण आणि वृद्ध लोकांनी बैठक घेण्याचे ठरले. Samarth Ramdas Swami स्थलांतराच्या प्रश्नांविषयी ही बैठक ठेवण्यात आली. संपूर्ण गावांत दवंडी पेटवली गेली. गावात सगळीकडे या बैठकीची चर्चा सुरू झाली. लोकांमधील उत्सुकता वाढीस लागली. गावातील एका वयोवृद्ध व्यक्तीला याविषयी कळले. स्थलांतराच्या प्रश्नांविषयी काही तोडगा काढावा, असे त्या व्यक्तीस वाटले. ज्या दिवशी बैठक होणार होती त्याच्या आदल्या दिवशी गावातील एक अतिशय वयोवृद्ध व्यक्ती गावातील प्रमुख व्यक्तींना भेटली. Samarth Ramdas Swami तिने त्या प्रमुखांना आपल्या गावांतील मातीत सोने असल्याचे सांगितले. हे सोने आपल्या गावातील तरुणांना मिळू शकेल, असेही सांगितले.
 

sn  
 
Samarth Ramdas Swami सुरुवातीला गावातील प्रमुखांना ती वृद्ध व्यक्ती जे सांगते आहे त्याबाबत खूप हसू आले. कारण ज्या गावांत अनेक वर्षांपासून दुष्काळ पडला आहे, हे त्या व्यक्तीला माहीत होते. मग तेथील मातीत सोने कसे असू शकते? ही हास्यास्पद गोष्ट त्या गाव प्रमुखांना वाटली. गाव प्रमुखांनी त्या वयोवृद्ध व्यक्तीस दुस-या दिवशी बैठकीला येण्यास सांगितले. त्या व्यक्तीने त्यांचे म्हणणे मान्य केले. गावांत दुस-या दिवशी बैठकीला सुरुवात झाली. नेहमीप्रमाणेच गावांतील तरुणांनी स्थलांतर करण्याचे सांगितले. वयोवृद्ध लोकांनी त्यास विरोध केला. बराच वेळ वाद-विवाद सुरू होता. Samarth Ramdas Swami गावांतील प्रमुखांनी वाद-विवाद सुरू असताना त्या वयोवृद्ध व्यक्तीला तेथे बोलावले. त्या प्रमुखांनी त्या व्यक्तीने सांगितलेली गोष्ट तेथील गावक-यांना सांगितली. ते गावकरीसुद्धा खूप हसले. काही तरुणांनी त्या वयोवृद्ध व्यक्तीला गावातील मातीत सोने कसे आहे? हे विचारले. त्यावर त्या व्यक्तीने विचारले की, आपल्या गावातील माती कोणत्या रंगाची आहे? ते तरुण म्हणाले की, आपल्या गावांतील माती काळ्या रंगाची आहे. त्या व्यक्तीने पुन्हा विचारले की, माती किती वर्षांपासून काळ्या रंगाची आहे? पुन्हा ते तरुण उत्तरले, माती अनेक वर्षांपासून काळ्या रंगाची आहे. Samarth Ramdas Swami त्या व्यक्तीने पुढला प्रश्न विचारला की, दुष्काळ किती वर्षांपासून पडला आहे आपल्या गावात? ते गावकरी म्हणाले, अनेक वर्षांपासून गावात दुष्काळ पडला आहे. त्या व्यक्तीने पुन्हा विचारले की, दुष्काळामुळे गावातील मातीचा दर्जा कमी झाला का आणि मातीचा रंग बदलला का? त्यावर ते तरुण म्हणाले की, गावातील मातीचा रंगही बदलला नाही आणि मातीचा दर्जाही कमी झाला नाही.
 
 
 
Samarth Ramdas Swami बराच वेळ हे प्रश्न-उत्तर सुरूच होते. त्या वयोवृद्ध अनुभवी व्यक्तीस नेमके काय सांगायचे आहे, हे त्या तरुणांना कळलेच नाही. त्या तरुणांनी आजीला विचारले की, या आपल्या गावातील काळ्या मातीचे करायचे काय? त्यावर ती व्यक्ती म्हणाली की, आपल्या गावातील काळी माती तुम्ही तरुणांनी जिथे काहीही उगवत नाही अशा प्रदेशात नेऊन विकली तर या मातीला qकमत प्राप्त होईल. तुम्ही तरुणांनी आपल्या गावातून स्थलांतर करण्यापेक्षा जर गावातील जे टाकाऊ आहे त्यातून काही टिकाऊ बनवण्याचा प्रयत्न केला तर आपल्या गावावर असलेल्या सर्वच संकटांचा नाश होईल. त्या तरुणांना ही गोष्ट पटली आणि त्यांनी गावातील काळी माती विकण्यास सुरुवात केली. Samarth Ramdas Swami सुरुवातीला त्या तरुणांना ही काळी माती विकण्याकरिता थोडा त्रास झाला. नंतर मात्र त्या काळ्या मातीचा दर्जा आणि गुणवत्तेमुळे वेगवेगळ्या प्रदेशातून काळ्या मातीला मागणी येऊ लागली. त्या मातीपासून उत्कृष्ट आणि उत्तम प्रकारची भांडी बनवण्यात येऊ लागली. काही कालावधीनंतर काळ्या मातीच्या विक्रीमुळे त्या गावातील सगळेच लोक श्रीमंत आणि ऐश्वर्यसंपन्न झालेत. Samarth Ramdas Swami पुढील वर्षी त्या गावात ठरल्याप्रमाणे बैठक त्याच वटवृक्षाच्या खाली घेण्यात आली. गावातील सगळेच लोक तेथे उपस्थित होते. गावातील प्रमुखांनी त्या वयोवृद्ध व्यक्तीस बोलावले. Samarth Ramdas Swami त्या व्यक्तीने सांगितलेली गोष्ट गावक-यांनी मनावर घेतली आणि त्यामुळे त्यांचे आयुष्यच बदलून गेले.
 
 
त्या व्यक्तीचे सगळ्यांनी आभार मानले. त्यावेळी ती व्यक्ती म्हणाली की, मागील वर्षी तुम्ही सगळेच चिंतीत दिसत होतात. तुमची दयनीय स्थिती झाली होती. Samarth Ramdas Swami पण, आपल्या गावातल्या मातीने तुमचे जीवनच बदलून टाकले आहे. आज तुमच्या प्रत्येकाकडे खूप सोने आहे. ते सोने आपल्या काळ्या मातीतलेच आहे. संस्थात्मक जीवनात किंवा एखाद्या संघटनेत अनेक वेळा कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागते. ब-याच वेळा अनेक उपक्रम, योजना, नियोजन उपयोगी पडत नाही. पर्यायाने संबंधित संस्थेचे खूप नुकसान होते. त्यामुळे संघटनेतील सर्वच लोकांमध्ये एकप्रकारचे नैराश्य निर्माण होते. Samarth Ramdas Swami अशा कठीण प्रसंगी ब-याच अप्रकाशित योजना, उपक्रम आणि नियोजन तसेच काही निरुपयोगी योजना जर योग्य पद्धतीने राबविण्यात आल्या तर मात्र संस्थेचा विकास होण्यास मदत होऊ शकते तसेच संबंधित संस्था प्रगतिपथावर जाऊ शकते. याकरिता योग्य मार्गदर्शन करणारे समर्थ नेतृत्व संस्थेत qकवा संघटनेत अत्यावश्यक असते.
 
 
श्रीसमर्थांनी श्रीमद् दासबोध ग्रंथात बहुजिनसि दशकातील जनस्वभाव निरुपण समासात असे म्हटले आहे की, Samarth Ramdas Swami
जनाचा लालची स्वभाव। आरंभीं म्हणती देव।
म्हनिजे मला कांहीं देव। ऐसी वासना।।१।।
कांहींच भक्ती केली नस्तां। आणी इछिती प्रसन्नता।
जैसें कांहींच सेवा न करिता। स्वामीस मागती
कष्टेंविण फळ नाहीं। कष्टेंविण राज्य नाहीं।
केल्याविण होत नाहीं। साध्य जनीं।।
आळसें काम नसतें। हें तों प्रत्ययास येतें।
कष्टाकडे चुकावितें। हीन जन।।
आधीं कष्टाचें दुःख सोसिति। ते पुढें सुखाचें फळ भोगिती। Samarth Ramdas Swami
आधीं आळसें सुखावती। त्यासी पुढें दुःख।।
येहलोक अथवा परलोक। दोहींकडे सारिखाच विवेक।
दीर्घ सूचनेचें कौतुक। कळलें पाहिजे।।
मेळविती तितुकें भक्षिती। ते कठीण काळीं मरोन जाती।
दीर्घ सूचनेनें वर्तती। तेचि भले।।
येहलोकींचा संचितार्थ। परलोकींचा परमार्थ।
संचितेंविण वेर्थ। जीत मेलें।।
येकदां मेल्यानें सुटेना। पुन्हा जन्मोजन्मीं यातना।
आपणास मारी वांचविना। तो आत्महत्यारा।।
प्रतिजन्मीं आत्मघात। कोणें करावें गणीत।
याकारणें जन्ममृत्य। केवी चुके।।
देव सकळ कांहीं करितो। ऐसें प्राणीमात्र बोलतो।
त्याचे भेटीचा लाभ तो। अकस्मात जाला।।
विवेकाच लाभ घडे। जेणें परमात्मा ठाईं पडे।
विवेक पाहातां सांपडे। विवेकीं जनीं।।
देव पाहातां आहे येक। परंतु करितो अनेक।
त्या अनेकास येक। म्हणों नये कीं।।
देवाचें कर्तृत्व आणि देव। कळला पाहिजे अभिप्राव। Samarth Ramdas Swami
कळल्याविण कितेक जीव। उगेच बोलती
उगेच बोलती मूर्खपणें। शाहाणपण वाढायाकारणें।
त्रुप्तिलागीं उपाव करणें। ऐसें जालें।।
जेहीं उदंड कष्ट केले। ते भाग्य भोगून ठेले।
येर ते बोलतचि राहिले। करंटे जन।।
करंट्याचें करंट लक्षण। समजोन जाती विचक्षण।
भरल्याचें उत्तम लक्षण। करंट्यास कळेना।।
त्याची पैसावली कुबुद्धी। तेथें कैची असेल शुद्धी।
कुबुद्धी तेचि सुबुद्धी। ऐसी वाटे।।
मनुष्य शुद्धीस सांडावें। त्याचें काये खरें मानावें। Samarth Ramdas Swami
जेथें विचाराच्या नावें। सुन्याकार।।
विचारें येहलोक परलोक। विचारें होतसे सार्थक।
विचारें नित्यानित्य विवेक। पाहिला पाहिजे।।
 
 
Samarth Ramdas Swami याचा अर्थ असा आहे की, कष्टाशिवाय या जगांत काहीच मिळत नाही. आळसामुळे कार्याचा नाश होतो ही साधी गोष्ट सामान्य लोकांना कळत नाही. जे आधी खूप कष्ट सोसतात; नंतर ते त्याचे फळं उपभोगतात. परंतु, जे आधी कष्ट करत नाहीत ते नंतर कष्ट करतात. विचारामुळेच इहलोकी, परलोकी कल्याण होते. विचारानेच मनुष्यजन्माचे सार्थक होते. म्हणून माणसाने विचारपूर्वक नित्यानित्यविवेक केला पाहिजे. Samarth Ramdas Swami श्रीसमर्थांनी समर्थ नेतृत्वाकरिता दीर्घसूचना किती आवश्यक आहे, हे त्यावेळी सांगितले होते. पुढील काळ कसा येईल हे कोणासही ठावूक नसते. म्हणूनच भाविष्यातील धोके आणि संधी लक्षात घेऊन जे कार्य करतात तेच दीर्घकाळापर्यंत टिकतात. Samarth Ramdas Swami त्यातूनच खरे समर्थ नेतृत्वनिर्मिती होते. प्रत्येक संस्थेच्या आणि संघटनेच्या सभासदाने आवर्जून श्रीसमर्थांच्या श्रीमद् दासबोध ग्रंथातील समर्थ नेतृत्व विषयांच्या सूत्रांचा अभ्यास करून आपापल्या संस्थेची आणि संघटनेची प्रगती करावी.
Powered By Sangraha 9.0