नवी दिल्ली,
इंग्लंडचा फलंदाज Will Jacks विल जॅक्सला बांगलादेशमध्ये राष्ट्रीय कर्तव्य बजावत असताना दुखापत झाली. त्यामुळे तो आगामी इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आगामी हंगामातून बाहेर झाला आहे. गत डिसेंबरमध्ये आयपीएल लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) विल जॅक्सला 3.2 कोटी रुपयांत विकत घेतले होते. 24 वर्षीय जॅक्सला या महिन्याच्या सुरुवातीला मीरपूरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या इंग्लंडविरुद्धच्या दुसर्या वन-डे सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना स्नायूंना दुखापत झाली होती.
या आठवड्याच्या सुरुवातीला स्कॅन केल्यानंतर व तज्ज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर त्याला आयपीएलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. आरसीबी सध्या विल जॅक्सच्या जागी बदली खेळाडू म्हणून न्यूझीलंडच्या मायकेल ब्रेसवेलचा संघात समावेश करण्यासाठी प्रयत्नशील आहे. Will Jacks जॅक्सने या वर्षी तिन्ही फॉरमॅटमध्ये इंग्लंडमध्ये पदार्पण केले होते. बांग्लादेशमध्ये पहिला वन-डे सामना खेळण्यापूर्वी पाकिस्तानमध्ये त्याने टी-20 व कसोटी कॅप्स मिळविली. दुखापतीमुळे या वर्षाच्या अखेरीस होणार्या विश्वचषकासाठी इंग्लंडच्या वन-डे संघात निवड होण्याच्या त्याच्या संधींवर परिणाम होऊ शकतो. ब्रेसवेलला आयपीएल लिलावात 1 कोटी रुपयांच्या मूळ किंमतीसह प्रवेश केला होता, परंतु त्याला कोणताही खरेदीदार मिळाला नाही. आरसीबी त्यांच्या आयपीएल मोहिमेची सुरुवात 2 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या लढतीने करेल.