मारेगाव,
हातउसने पैसे घेऊन त्याबदल्यात धनादेश दिला. परंतु विहित मुदत निघून गेल्यानंतरही पैसे न दिल्याने धनादेश बँकेमध्ये वटविण्यासाठी टाकला. परंतु Check Bounce धनादेशाचा अनादर झाल्याने आरोपीला आठ महिन्यांचा कारावास आणि 3.75 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला.
मारेगाव येथील हरिओम मोहन सिडाणा यांनी तुषार बोंकिंपल्लीवार यांच्याकडून 3 लाख 25 हजार रुपये हातउसने घेतले होते. त्याबदल्यात सिडाणा यांनी बोंकिंपल्लीवार यांना धनादेश दिला होता. परंतु हा Check Bounce धनादेश अनादरीत झाल्याने बोंकिंपल्लीवार यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायाधीश निलेश वासाडे यांनी दोन्ही पक्षांची बाजू ऐकून आरोपी हरिओम मोहन सिडाणा यास आठ महिन्यांची शिक्षा आणि पावणेचार लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तक्रारकर्त्याची बाजू अॅड. परवेज पठाण यांनी मांडली.