खेलो इंडियाच्या माध्यमातुन वर्धेच्या क्रीडा संकुलला निधी द्या

18 Mar 2023 20:02:53
तभा वृत्तसेवा 
वर्धा, 
Khelo India : खेलो इंडियाच्या माध्यमातुन देशातील ग्रामीण भागातील खेळाडूला एक नवीन व्यासपीठ उपलब्ध करुन दिलेले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात खेळासाठी भरीव तरतूद केली आहे व अर्थसंकल्प क्रीडा जगतासाठी ऐतिहासिक आहे. या योजनेंतर्गत वर्धा येथील क्रीडा संकुलात पायाभूत सुविधा व विकास करण्यासाठी 25 कोटी देण्यात यावी अशी मागणी खा. रामदास तडस यांनी केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर यांची नवी दिल्ली येथे कार्यालयात भेट घेऊन केली.
 
Khelo India
 
वर्धा येथे 1 एप्रिल रोजी होणार्‍या रुस्तम-ऐ-हिंद या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन व म.गां.अं. हिंदी विश्वविद्यापीठ अंतर्गत मेजर ध्यानचंद क्रीडा संकुलाच्या उद्घाटनाचे निमंत्रण देण्यात आलेे. लोकसभा मतदार क्षेत्रात आवश्यकतेनुसार व आपल्या मागणीनुसार जिल्हाधिकारी मार्फत प्रस्ताव सादर करावा, यावर निश्चितच सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल व खेलो इंडिया या योजना प्रभावीपणे राबविण्याकरिता केंद्र सरकार सहकार्य करेल असे आश्‍वासन ना. ठाकुर यांनी दिले. वर्धा येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे खेळाडूंना पायाभूत सुविधा, उपकरणे प्रदान करणे, प्रशिक्षकांची नियुक्ती आणि क्रीडा पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्या या दृष्टिकोनातुन केन्द्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर यांची भेट घेऊन मागणी केली आहे, त्यांनी जिल्हाधिकारी मार्फत जिल्हा क्रीडा संकुल पायाभुत सुविधाबाबतचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितला आहे यावर निश्‍चित कारवाई होईल असा विश्‍वास खा. रामदास तडस यांनी व्यक्त केला.
 
Powered By Sangraha 9.0