काँग्रेस आमदाराची महिला पोलिस अधिकार्‍याला अश्लील शिवीगाळ

19 Mar 2023 20:30:57
भोपाळ,
मध्य प्रदेशातील श्योपूर येथील (Congress MLA) काँग्रेस आमदार बाबू जांडेल यांच्यावर एका महिला पोलिस अधिकार्‍याला अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या महिला पोलिस अधिकार्‍याने एका तरुणाची दुचाकी पकडली होती. ती सोडवण्यासाठी आमदार बाबू जंडेल यांनी महिला पोलिस अधिकारी माधवी शाक्य यांच्याशी फोनवर बोलत असताना त्यांना अश्लील शिवीगाळ केली. या संवादाचा ऑडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
 
Congress MLA
 
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, (Congress MLA)  पोलिस वाहनांची नेहमीप्रमाणे तपासणी करीत होते. दरम्यान, एक तरुण हेल्मेट न घालता दुचाकी घेऊन तेथे पोहोचला होता. तेव्हा पोलिसांनी त्याची दुचाकी जप्त करून त्याला चालान घेण्यास सांगितले होते. मात्र, चालान बनवून घेण्याऐवजी तरुण घटनास्थळावरून निघून गेला. यानंतर पोलिसांनी त्या युवकाची दुचाकी पोलिस ठाण्यात पाठवली. या घटनाक्रमानंतर काँग्रेस आमदार बाबू जंडेल यांनी महिला पोलिस अधिकारी माधवी शाक्य यांना फोन करून दुचाकी सोडण्यास सांगितले. यासोबतच त्यांना चांगलेच सुनावून अश्लील शिवीगाळ केल्याचाही आरोप आहे.
 
 
या संपूर्ण प्रकरणात महिला पोलिस अधिकार्‍याचे वक्तव्यही समोर आले आहे. मी दलित समाजाची आहे, हे आमदारांना माहीत होते, त्यानंतरही या आमदारांनी अश्लील भाषेत बोलून शिवीगाळ केल्याचे माधवी शाक्य यांनी म्हटले आहे. पीडित पोलिस अधिकार्‍याने काँग्रेस आमदार बाबू जंडेल यांच्याविरुद्ध एससी/एसटी (Congress MLA)  कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ऑडिओ समोर आल्यानंतर आपण महिला उपनिरीक्षकाशी याबाबत चर्चा केली होती. या प्रकरणाची पुष्टी झाल्यानंतर शनिवार, 18 मार्च रोजी महिला उपनिरीक्षकाच्या वतीने पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गरज पडल्यास आमदाराविरुद्ध वॉरंटही काढण्यात येईल, असे पोलिस अधीक्षक आलोक कुमार सिंह यांनी सांगितले.
 
 
आमदाराची सारवासारव
दरम्यान, प्रकरण अंगावर शेकत असल्याचे पाहताच काँग्रेसचे आमदार बाबू जांडेल यांनी सारवासारव केली आहे. आपण महिला पोलिस अधिकार्‍याशी कुठलेही गैरवर्तन केले नसल्याचे (Congress MLA)  आमदारांनी म्हटले आहे. आपल्याला या प्रकरणात अडकवण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
Powered By Sangraha 9.0