हॅलण्डची पुन्हा हॅट्ट्रिक मॅन्चेस्टर सिटीचा विजय

19 Mar 2023 21:26:51
मॅन्चेस्टर सिटी, 
एर्लिंग हॅलण्डने (Erling Holland) एका आठवड्यात दुसर्‍यांदा हॅट्ट्रिक साजरी केली. त्याने नोंदविलेल्या हॅट्ट्रिकच्या जोरावर मॅन्चेस्टर सिटीने एफए चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात बनर्ली संघावर सरळ 6-0 गोलने विजय नोंदविला. या कामगिरीबरोबरच हॅलण्डने या हंगामात 40 गोलचा टप्पा गाठला. यापूर्वी या आठवड्यातच एतिहाद स्टेडियमवर चॅम्पियन्स लीगच्या सामन्यात नॉर्वेच्या (Erling Holland) हॅलण्डने आरबी लिपझिग संघाविरुद्ध हॅट्ट्रिकसह 5 गोल नोंदविले. 22 वर्षीय हॅलण्डने 32व्या व 35व्या मिनिटाला गोल केले व सामना संपण्यापूर्वी रिबाऊंडला गोलमध्ये रूपांतरित करत हंगामातील सहावी हॅट्ट्रिक साजरी केली.
 
Erling Holland
 
गत जूनमध्ये बोरुशिया डॉर्टमंडमधून मॅन्चेस्टर सिटीमध्ये दाखल झाल्यापासून (Erling Holland) हॅलण्डने आश्चर्यकारक 42 गोल आहेत. मॅन्चेस्टर सिटीला उपांत्य फेरीत प्रवेश करून देताना पर्यायी खेळाडू कोल पाल्मरने दोन गोल केले व त्यानेही या आठवड्यात 13 गोल केले. एका हंगामात सर्व स्पर्धांमध्ये किमान 40 गोल करणारा हॅलण्ड हा हा प्रीमियर लीग युगातील केवळ सहावा खेळाडू ठरला. यापूर्वी अशी कामगिरी रुड व्हॅन निस्टेलरॉय (44), मोहम्मद सलाह (44), क्रिस्टियानो रोनाल्डो (42), अँडी कोल (41) व हॅरी केन (41) आदिंनी केली.
Powered By Sangraha 9.0