जेस्विन ऑल्ड्रिनचा लांब उडीत राष्ट्रीय विक्रम

    दिनांक :02-Mar-2023
Total Views |
- भारतीय खुली थ्रो व जम्प स्पर्धा
- तजिंदरपाल, किशोरचा नवीन स्पर्धा विक्रम

विजयनगर, 
येथील इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टमध्ये आयोजित द्वितीय भारतीय खुल्या थ्रो आणि जम्प स्पर्धेच्या पहिल्या दिवशी जेस्विन ऑल्ड्रिनने पुरुषांच्या लांब उडीत नवीन राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली आहे. स्टार गोळाफेकपटू Tejinder Pal Singh तजिंदरपाल सिंग तूर व भालाफेकपटू किशोर जेनाने नवीन स्पर्धा विक‘माची नोंद केली. 21 वर्षीय जेस्विनने तिसर्‍या प्रयत्नात 8.42 मीटरची नोंद करीत मुरली श्रीशंकरचा 8.36 मीटरचा विक्रम मोडीत काढला.जेस्विनने यापूर्वी गत वर्षी थेन्हिपालम येथील फेडरेशन चषकात 8.26 मीटरची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली होती.
 
 
TAJINDER-PAL-SINGH
 
पुरुषांच्या गोळाफेकमध्ये तजिंदरने 19.95 मीटरची नोंद करीत सुवर्णपदक पटकावले व या कामगिरीबरोबरच त्याने आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी (पात्रता निकष- 19मीटर) आपली पात्रता सिद्ध केली. नवोदित खेळाडू करणवीर सिंगने 19.54 मीटर फेक करून रौप्यपदक जिंकले व आसियाई स्पर्धेची पात्रता गाठली. साहिब सिंगने 18.77 मीटर फेक करून कांस्यपदक मिळविले. महिलांच्या गोळाफेकमध्ये मनप्रीत कौरने 16.73 मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकत मोसमाची जोरदार सुरुवात केली व आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीची (पात्रता निकष- 16.30 मीटर) पात्रता सिद्ध केली. आभा खटुआने (15.06 मीटर) रौप्यपदक, तर राजस्थानच्या कचनार चौधरीने (14.34 मीटर) कांस्यपदक पटकावले.
 
 
 
ओडिशाच्या किशोर जेना याने पुरुषांच्या भालाफेकमध्ये 78.93 मीटर फेक करीत नवीन स्पर्धा विक‘म नोंदविला. त्याने यापूर्वी रोहित यादवने नोंदविलेला स्पर्धा विक्रम मोडीत काढला. पंजाबच्या सरबजीत सिंगने (75.63 मीटर) रौप्यपदक, तर अभिषेक ड्रॉलने (73.51 मीटर) कांस्यपदक जिंकले. ही माझी हंगामातील पहिली मैदानी स्पर्धा आहे, मात्र मी माझ्या कामगिरीवर समाधानी नाही. मला 20 मीटरचा टप्पा पार करायचा होता, पण थोडा कमी पडलो. यावर्षी माझे ध्येय राष्ट्रीय व आशियाई विक‘म मोडण्याचे आहे, असे Tejinder Pal Singh तजिंदर म्हणाला.