मालेगाव,
FIR : तालुयातील जऊळका रेल्वे पोस्टे अंतर्गत येत असलेल्या शिक्षण संस्थेत काम शिक्षकाच्या आत्महत्येप्रकरणी मृतकाच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरुन जऊळका पोलिसांनी चौघावर गुन्हा दाखल केला.
वाशीम येथील ज्योत्स्ना कैलास इंगोले यांनी जऊळका पोलिसात तक्रार दिली की, तिचे पती कैलास इंगोले हे राष्ट्रीय विद्यालय मसला ता. मालेगाव येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. मागील २३ वर्षापासुन संस्थाध्यक्ष सत्यानंद कांबळे, सिद्धार्थ कांबळे व त्यांचा भाचा सचिन अढागळे, मुख्याध्यापक विष्णू कांबळे हे नेहमी कैलास इंगोले यांना शिक्षण सेवकाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर नोकरीत कायम करण्यासाठी दहा लाखाची मागणी करून त्यांचा मानसीक छळ करीत होते . अखेर या जाचाला कंटाळून कैलास इंगोले ( रा. अल्लाडा प्लाट वाशीम) यांनी २० मार्च रोजी जोडगव्हाण ते मसला दरम्यान रेल्वेसमोर उडी घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी जऊळका पोस्टेला गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास अमोल गोरे हे करीत आहेत.