श्रीनगरमध्ये 700 वर्षे जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू

21 Mar 2023 18:40:40
- 2014 च्या पुरात क्षतिग्रस्त
 
श्रीनगर, 
जम्मू-काश्मीर प्रशासनाने श्रीनगर शहराच्या मध्यभागी असलेल्या 700 वर्षे जुन्या Mangleshwar Bhairav Temple मंगलेश्वर भैरव मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले आहे. 2014 मध्ये आलेल्या पुरामुळे या मंदिराची पडझड झाली होती, असे अधिकार्‍यांनी सांगितले. अंदाजे 1.62 कोटी रुपये जीर्णोद्धारासाठी लागणार आहे. हे काम जून 2022 मध्ये सुरू करण्यात आले होते आणि पुढील महिन्यात ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. मंदिर सुमारे 700 वर्षे जुने असल्याने प्रत्येकाला त्याचे महत्त्व माहीत आहे. सप्टेंबर 2014 च्या महापुरात या मंदिराच्या काही भागाला भेगा पडल्या होत्या.
 
 
Mangleshwar Bhairav Temple
 
आम्ही स्थापत्य आणि वारसा यांचे पुनरुज्जीवन, जीर्णोद्धार, जतन आणि देखभाल करण्याच्या योजनेंतर्गत मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले आहे, असे श्रीनगरचे उपायुक्त मुहम्मद एजाज असद यांनी सांगितले. काम सुरू होण्यापूर्वी मंदिराचे मूळ स्वरूप जतन करण्याबाबत मंदिर व्यवस्थापन समितीसोबत सल्लामसलत करण्यात आली होती. मंदिर परिसरात दोन झाडे आहेत. आम्ही त्यांना हात लावला नाही. जीर्णोद्धारासाठी सिमेंटचा वापर केलेला नाही. ज्या सामग्रीने मंदिर बांधले होते तेच वापरले जात असल्याचे मुहम्मद एजाज असद म्हणाले. या Mangleshwar Bhairav Temple मंदिराशी लाखो लोकांची श्रद्धा जोडलेली आहे. जीर्णोद्धारानंतर देशभरातून लोक मोठ्या सं‘येने येथे येतील, असा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0