रायबरेलीतील हॉकी स्टार राणी रामपालच्या नावावर स्टेडियम

    दिनांक :21-Mar-2023
Total Views |
नवी दिल्ली, 
Rani Rampal राणी रामपाल ही पहिली भारतीय महिला हॉकीपटू ठरली आहे, जिच्या नावावर स्टेडियम आहे. एमसीएफ रायबरेलीने हॉकी स्टेडियमचे नाव बदलून राणी’ज गर्ल्स हॉकी टर्फ असे ठेवले आहे. एमसीएफ रायबरेलीने हॉकी स्टेडियमचे नाव बदलून ‘राणीचे गर्ल्स हॉकी टर्फ’ असे ठेवले, याबद्दल मला आपला आनंद व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात, असे राणीने आपल्या ट्विटर हॅण्डलवर लिहीले. तिने समाजमाध्यमावर छायाचित्रसुद्धा सामायिक केले असून यात ती खेळाडूंशी संवाद साधताना व इतर सहकारी सदस्यांसह स्टेडियमचे उद्घाटन करताना दिसत आहे.
 
 
RANI-RAMPAL
 
माझ्या नावावर स्टेडियम असणारी मी पहिली महिला हॉकीपटू झालो आहे, हा माझ्यासाठी अभिमानास्पद आणि भावनिक क्षण आहे. मी हे भारतीय महिला हॉकी संघाला समर्पित करते व यामुळे पुढील महिला हॉकी खेळाडूंच्या पिढीला प्रेरणा मिळेल, असे ती म्हणाली. या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफि‘का दौर्‍यात Rani Rampal राणीने भारतीय संघात पुनरागमन केले होते, जेव्हा तिचा सदस्यीय संघात समावेश करण्यात आला होता. एफआयएच महिला हॉकी प्रो लीग 2021-22 मध्ये बेल्जियमविरुद्ध अखेरचा सामना खेळल्यानंतर राणी संघात परतली होती. राणीने भारतासाठी 250 वा सामना जिंकला होता. 28 वर्षीय राणी टोकियो ऑलिम्पिकपासून दुखापतीचा सामना करीत होती व त्यानंतर तिला विश्वचषक व राष्ट्रकुल-2022 क्रीडा स्पर्धेसाठी संघातून बाहेर ठेवण्यात आले होते.