मृतक विद्यार्थिनीच्या कुंटूबाला 4 लाखाचे धनादेश वितरण

    दिनांक :22-Mar-2023
Total Views |
चामोर्शी, 
Cheque distribution : वीज कोसळून मृत्यू झालेल्या 15 वर्षीय स्वीटी बंडू सोमनकर हिच्या कुटुंबीयांना शासनाच्या नैसर्गिक आपत्ती सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय चामोर्शीतर्फे 4 लाखाचे धनादेश प्रदान करण्यात आला.
 
Cheque distribution
 
स्वीटी ही विश्‍वशांती विद्यालय कुनघाडा रै. येथे 9 व्या वर्गात शिक्षण घेत होती. शाळेची सुट्टी झाल्यानंतर स्वीटी घरी परत जात असतांना वाटेतच तिच्यावर वीज कोसळून मृत्यू झाल्याची घटना 18 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास बाजारपेठ (कुनघाडा रै.) ते मालेर चकच्या मधोमध पुलाजवळ घडली होती. मंगळवारी, 21 मार्च रोजी शासनाच्या नैसर्गिक आपत्ती सानुग्रह अनुदान योजेनेंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय तथा तहसील कार्यालय चामोर्शीतर्फे 4 लाखाचे धनादेश मृतक स्वीटीचे वडिल बंडू सोमनकर, आई वैशाली, भाऊ शंतनु सोमनकर यांना चामोर्शीचे तहसीलदार संजय नागटिळक यांच्या हस्ते देण्यात आला.
 
 
यावेळी नायब तहसीलदार राजु वैद्य, मडळं अधिकारी तारेश फुलझले, माजी संरपच निलकंठ पिपरे, ग्रामपंचायत सदस्य वसंत चलाख, अशोक बोदलकर, जगन्नाथ कुनघाडकर, ढिवरू चलाख, मळूजी वासेकर, रतन कुनघाडकर, साईनाथ वासेकर, रविंद्र बोदलकर, नारायण सोमनकर यासह गावातील नागरिक उपस्थित होते. यावेळी मदत देण्याकरीता घरी गेलेल्या अधिकार्‍यांना पाहुन स्वीटीच्या आईच्या डोळ्यातील अश्रृ अणावर झाले होते.