दुर्धर आजाराने ग्रस्त कुटूंबास आर्थिक मदत

    दिनांक :23-Mar-2023
Total Views |
मुलचेरा, 
तालुक्यातील गोमणी येथील सुक्रंजन Financial suffering शील मागील 1 वर्षापासून दुर्धर आजाराने ग्रस्त असून त्यांचेवर उपचार सुरु आहे. मात्र घरची परिस्थिती हलाखीची असल्याने उपचा घेण्यास अडचण निर्माण होत आहे. ही बाब हेरुन माजी आमदार तथा भारत राष्ट्र समितीचे नेते दिपक आत्राम यांनी शील कुटूंबियांची भेट घेत त्यांना आर्थिक मदत केली.
 
 
gy
 
 
दिपक आत्राम मुलचेरा तालुक्याच्या Financial suffering दौर्‍यावर आहेत. दरम्यान त्यांना गोमणी येथील सुक्रजन शील यांच्या दुर्धर आजाराविषयीची माहिती पदाधिका-यांनी दिली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी आविसं कार्यकर्त्यांसह थेट गोमणी येथील शील कुटूंबाचे घर गाठले. यावेळी त्यांनी दुर्धर आजाराची माहिती घेत सुक्रंजन शील यांची आस्थेने विचारपुस केली. तसेच उपचारासाठी आर्थिक मदत केली. याप्रसंगी सुक्रंजन शील यांच्या पत्नी मोना शील, आंबटपल्लीचे सरपंच उमेश कडते, वेलगूर उपसरपंच उमेश मोहूर्ले, गोमणी ग्रापं सदस्य शुभम शेंडे, विनोद कावेरी, प्रवीण रेषे, विजय विरमालवार आदींसह आविसं पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.