नटराज डान्स ग्रुप घाटंजीच्या कलाकारांनी उमटवला ठसा

24 Mar 2023 17:35:39
घाटंजी, 
भारतीय जनता युवा मोर्चा यवतमाळ जिल्हाद्वारा डान्स महाराष्ट्र डान्स या राज्यव्यापी नृत्य स्पर्धेत एकल व समूह नृत्याचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रत्येक श्रेणीतून तीन क्रमांक काढण्यात आले. या चित्तथरारक स्पर्धेत ग्रामीण भागात मोडत असलेल्या Nataraj Dance Group नटराज डान्स ग्रुपने सर्व स्पर्धकांना मागे टाकत द्वितीय क्रमांक पटकविला.
 
 
Nataraj
 
Nataraj Dance Group नटराज डान्स ग्रुपचे प्रशिक्षक स्वराज भगत यांनी आपल्या ग्रुपद्वारे गोंधळ हे महाराष्ट्रातील लोकनृत्य सादर करून प्रेक्षकांना व परिषक्षकांना भारावून टाकले. या ग्रुपमध्ये राहुल भगत, ईशान राठोड, निशांत राठोड, पूर्वा राठोड, प्राप्ती भोयर, निधी चव्हाण, प्रतीक्षा काकडे, संगीता मूनेश्वर, रोहन त्रिपाठी व स्वराज भगत यांनी सहभाग नोंदविला. या नृत्यासाठी त्यांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन पुरस्कृत करण्यात आले.
Powered By Sangraha 9.0