पाक ड्रोनने सोडलेली पाच ग्लॉक पिस्तुले, 90 काडतुसे जप्त

24 Mar 2023 18:51:51
- पंजाब सीमेवर बीएसएफची कारवाई
 
 
नवी दिल्ली/गुरदासपूर, 
Pak drones पाकिस्तानी ड्रोनने टाकलेली पाच ऑस्ट्रिया बनावटीची ग्लॉक पिस्तुले व 90 पेक्षा जास्त कॅलिबरच्या गोळ्या सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) पंजाबमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर जप्त केल्या, असे अधिकार्‍यांनी शुक्रवारी सांगितले. गुरुदासपूर सेक्टरमधील मेतला भागात पहाटे अडीचच्या सुमारास शस्त्रे व दारुगोळा टाकण्यात आला. घुसखोर रॉग ड्रोनवर आमच्या सैन्याने गोळीबार केला व नंतर परिसराची झडती घेतली असता शेतातून एक पाकीट सापडले. यात पाच ग्लॉक पिस्तुले, दहा मॅगझीन्स व 91 राऊंड आहेत, असे बीएसएफच्या अधिकार्‍यांनी सांगितले.
 
 
Pak drones
 
Pak drones ही खेप सीमावर्ती राज्यातील खलिस्तानी फुटीरतावादी गटांसाठी असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांना आहे. ग्लॉक हे एक अत्याधुनिक अर्ध-स्वयंचलित पिस्तूल आहे जे नॅशनल सिक्युरिटी गार्ड (एनएसजी) व इतर कमांडोसारख्या दहशतवादविरोधी दलांद्वारे वापरले जाते. हे क्लोज क्वार्टर युद्ध परिस्थिती व व्हीआयपी संरक्षण कर्तव्यांसाठी वापरले जाते, कारण त्याची श्रेणी 35-50 मीटर आहे. हे ऑस्ट्रिया व अमेरिकेत उत्पादित केले जाते.
Powered By Sangraha 9.0