लॉरेन्स बिश्नोईचे नाव घेतल्यास खबरदार...

26 Mar 2023 13:13:36
चंदिगढ, 
Lawrence Bishnoi's सिद्धू मुसेवालाचे वडील बलकौर सिंह यांना पुन्हा एकदा ई-मेलद्वारे जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. दिवंगत पंजाबी रॅपरच्या वडिलांनी आरोप केला आहे की, मला लवकरच मारले जाईल, अशी धमकी मला राजस्थानमधून ईमेलमधून मिळाली आहे. मला लॉरेन्स बिश्नोईचे नाव घेण्यापासून परावृत्त करण्यास सांगितले आहे. यापूर्वीही 25 एप्रिलपूर्वी जीवे मारण्याच्या धमक्या आल्याचा आरोप त्यांनी केला होता. ते म्हणाले मी काय चूक करतोय? मी माझ्या मुलाची केस लढू नये का? मला 18, 24 आणि 27 फेब्रुवारीला 25 एप्रिलपूर्वी ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. मला सरकारला सांगायचे आहे की, माझी सुरक्षा काढून घेण्यात यावी. मी लढत राहीन.
 
 krushna
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुसेवाला यांच्या वडिलांना धमकावल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 7 मार्च रोजी, त्यांनी पंजाब विधानसभेच्या बाहेर निदर्शने केली आणि त्यांच्या मुलाच्या हत्येची केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) चौकशी करण्याची मागणी केली. याप्रकरणी कसलाही तपास होत नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. ते म्हणाले होते, गेल्या 10 महिन्यांत मी अनेकदा पोलिस आणि प्रशासनाकडे गेलो. मला आश्‍वासन मिळाले, पण इथे जे घडत आहे ते माझ्या मुलाच्या हत्येवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न आहे. Lawrence Bishnoi's माझ्या बाजूने काहीही चालले नाही. गँगस्टर गोल्डी ब्रारवर झालेल्या कारवाईबाबतही त्यांनी सरकारला सवाल केला. सिद्धू मुसेवाला यांची गेल्या वर्षी 29 मे रोजी मानसा येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याच्या एक दिवस आधी राज्य सरकारने त्यांची सुरक्षा कमी केली होती. त्याच्यावर अगदी जवळून गोळी झाडण्यात आली. त्याला मानसा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले असता मृत घोषित करण्यात आले. हल्लेखोरांनी मूसवाला यांच्यावर 30 हून अधिक राऊंड गोळीबार केला.
Powered By Sangraha 9.0