तभा वृत्तसेवा
आर्णी,
महादीप परीक्षेत गगनभरारी घेणारा विद्यार्थी (Viraj Jagtap) विराज जगताप प्राथमिक मराठी शाळा लोणी यांचा शिक्षण विभाग पंचायत समिती आर्णीच्या वतीने सत्कार सोहळा घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी किशोर रावते, प्रमुख अतिथी विस्तार अधिकारी कुसुम भगत, केंद्रप्रमुख राजू परमार, चिखली शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक रमेश खरतडे, लोणीचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक विष्णू शिंदे, मार्गदर्शक शिक्षक संदीप तंबाखे, महेंद्र पाटील, कुमारी पल्लवी पोकळे, संदीप जाधव, छत्रपती गजभिये, लोणी येथील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय जगताप, लोणीचे उपसरपंच अमोल वारंगे, लोणी केंद्रप्रमुख गजानन सेलोकार, बीआरसीतील सर्व कर्मचारी आणि सर्व केंद्रप्रमुख या कार्यक‘माला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन माधुरी चंद्रे यांनी केले. आभार तुकाराम चव्हाण यांनी मानले. विद्यार्थी (Viraj Jagtap) विराज जगताप याला बीआरसीच्या वतीने विजयी ट्रॉफीसोबतच स्पर्धा परीक्षा पुस्तकाचे वितरण करण्यात आले. गटशिक्षणाधिकारी किशोर रावते यांनी या प्रसंगी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी विराजला यशापर्यंत पोहचविण्याची यशोगाथा त्याचे मार्गदर्शक संदीप तंबाखे यांनी अतिशय यथोचित मांडली. विराजच्या भावी आयुष्यासाठी त्याला सर्वांनी शुभेच्छा दिल्या.