तंबाखूजन्य पदार्थ खाणे पडले महागात

- साडेसहाशे लोकांकडून एक लाखावर दंड वसूल

    दिनांक :29-Mar-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा 
भंडारा, 
Tobacco Products : तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातंर्गत 652 लोकांवर कोटपा कायदयातंर्गत कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण 1 लाख 20 हजार 35 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयाने दिली आहे.
 
Tobacco Products
 
नविन पिढीला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थापासून दूर राहावी यासाठी शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी पोलिस विभाग, शिक्षण विभाग, सलाम फांऊडेशन, आरोग्य प्रबोधीनी संस्थेद्वारे भंडारा जिल्हयात तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येतो. नुकताच जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातंर्गत राबविण्यात आलेल्या बाबींचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.दिपचंद सोयाम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मिलींद सोमकुंवर हे प्रामुख्याने उपस्थित होते.
 
 
जिल्हयात एकूण 1329 शाळांमध्ये तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. तर 193 शाळा तंबाखूमुक्त झाल्या असून या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थी व्यसनापासून दूर राहत आहेत. जिल्हयातील अन्य शाळा-महाविदयालयांमध्ये पोलिस विभाग व शिक्षण विभागाच्या पथकाने अचानक भेटी देवून या अभियानाच्या यशस्वीता तपासण्यात यावी असे निर्देश जिल्हाधिकाèयांनी यावेळी दिले.