अर्जेंटिनाच्या मेस्सीने पार केला 100 गोलचा टप्पा

29 Mar 2023 19:26:32
सॅण्टियागो,
कुराकाओविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय मैत्रिपूर्ण सामन्याच्या पूर्वार्धातील तीन गोलांसह (Lionel Messi) लियोनेल मेस्सीने हॅट्ट्रिक नोंदविली व अर्जेंटिनासाठी 100 कारकीर्दीतील गोल पार केले. डिसेंबरमध्ये विश्वचषक जिंकल्यानंतर अर्जेंटिनाने आपल्या दुसर्‍या सामन्यात कॅरेबियन संघाचा 7-0 असा पराभव केला. कुरकाओविरुद्ध 35 वर्षीय मेस्सीने 20 व्या मिनिटाला उजव्या पायाच्या फटक्याने 100 गोलचा टप्पा गाठला. निको गोन्झालेझने आणखी तीन मिनिटांनंतर क्लोज रेंजमधून हेडरसह आणखी एका गोलची भर घातली.
 
Lionel Messi
 
त्यानंतर 33 व्या मिनिटाला (Lionel Messi) मेस्सीने अर्जेंटिनासाठी 101 वा व 37 व्या मिनिटाला सहजपणे 102 वा गोल केला. दोन मिनिटांपूर्वी त्याने गोलजाळ्याच्या जवळ एन्झो फर्नांडिसला गोल करण्यास मदत केली होती. अधिकृत सामन्यांमध्ये राष्ट्रीय संघांसाठी सर्वाधिक गोल करणार्‍यांच्या यादीत अर्जेंटिनाचा कर्णधार केवळ दोन खेळाडूंच्या मागे राहतो. एक म्हणजे पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो (122) आणि इराणचा अली दाई (109).
Powered By Sangraha 9.0