भंडारा-पवनी रस्त्याच्या दुरावस्थेविरुध्द शिवसेना उतरणार रस्त्यावर
- आ. भोंडेकरांच्या नेतृत्वात रस्तारोको चा इशारा
दिनांक :29-Mar-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
भंडारा,
Shiv Sena : भंडारा ते पवनी या रस्त्याचे बांधकाम रखडल्यामुळे रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. केंद्रीय महामार्ग रास्ते विकास मंत्रालयाने यावर तातडीने उपाय योजना न केल्यास 31 मार्च 2023 रोजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात राष्ट—ीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा भंडारा जिल्हा शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे. या संबंधीचे निवेदन आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात आज जिल्हाधिकारी यांच्यामार्फत केंद्रीय सचिव राष्ट—ीय महामार्ग मंत्रालय नवी दिल्ली यांना देण्यात आले आहे.